You are currently viewing मांगवली गावची वीज सातत्याने खंडित केल्याने रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम

मांगवली गावची वीज सातत्याने खंडित केल्याने रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम

मांगवली गावातील रहिवाशांकडून विद्युत उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर

वैभववाडी

मांगवली गावात वीज सातत्याने खंडित होत असल्यामुळे मांगवलीतील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अचानक वीज खंडित झाल्यामुळे शेतीची कामे विजेच्या प्रकाशावर केली जात असल्याने त्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच अंधारात चालताना पडून नागरिकांना दुखापत होऊन हातपाय जायबंदी होत आहेत. अंधारात सरपटणारे प्राणी ही दंश करू शकतात अशी भीती मांगवली रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

अचानक वीज जाण्याने घरातील इलेक्ट्रिक उपकरणे अचानक बंद पडून निकामी होत आहेत. तसेच वीज सेवा खंडित झाल्याने वयोवृद्ध पुरुष, महिला, गरोदर स्त्रियांचे अतोनात हाल होत आहेत. वीज सेकंदा सेकंदाला तर दोन चार दिवस खंडित असते. मांगवली गावातील पुनर्वसन आणि आजूबाजूच्या गावात पण वीजपुरवठा खंडित असतो. नैसर्गिक आपत्ती किंवा अचानक प्रसंगी वीज जाऊ शकते, परंतु मांगवली गावातील वीज पुरवठा पूर्व नियोजित कट करत खंडित केली जाते. त्याबाबत संबंधित कार्यालयात चौकशी केली असता टेक्निकल फॉल्ट आहे असे सातत्याने सांगितले जाते. मागील दोन वर्ष या समस्येला मांगवली ग्रामस्थ सामोरे जात आहेत.

तरी या उद्भवत असलेल्या समस्यांचे तात्काळ निवारण करावे अशा आशयाचे निवेदन काल 10 ऑक्टोबर 2022 रोजी एम. एस. ई. बी. चे उपकार्यकारी अभियंता वैभववाडी यांना मांगवली गावातील लाईटच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी मांगवली गावचे दक्ष नागरिक वासुदेव जुवाटकर, मधुकर आयरे, विशाल राणे, गणेश राणे, सचिन आयरे, अंकुश नाटेकर हे उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा