You are currently viewing विजेचा लोळ अंगावर कोसळून सांगेली येथील युवक जागीच ठार….

विजेचा लोळ अंगावर कोसळून सांगेली येथील युवक जागीच ठार….

सावंतवाडी

अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे सांगेली-गुरगुटवाडी येथील युवक जागीच ठार झाला आहे. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. हनुमंत नाना झोरे (वय २९) असे त्याचे नाव आहे. तो सकाळी उठून लघुशंकेसाठी गेला असता ही घटना घडली. परतीच्या पावसात पडलेल्या विजेत ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.

अधिक माहिती अशी की, या भागात आज पहाटेपासूनच विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाला होता. श्री. झोरे लघुशंकेसाठी घराच्या अंगणात गेला असता अचानक त्याच्या अंगावर विजेचा लोळ पडून तो जागेच खाली पडला. तो घरात पुन्हा परतला नाही. म्हणून त्याच्या घरातील कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहतात तर तो अंगणात विजेचा लोळ पडून पडला होता. त्यानंतर गावातील व्यक्तींनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तो अविवाहित होता. शेतीची कामे व मेंढ्या पालन हा त्याचा व्यवसाय होता. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही या कुटुंबाचे विचारपूस केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा