ॲड. अशपाक शेख व ॲड. मनीषा नरे यांचे यशस्वी युक्तिवाद
दिनांक 31/ 12/ 2021 रोजी दुपारी 12:30 च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी चालू होती. दरम्यान त्या दिवशी मतमोजणी सुरू असताना समता बाजार दुकानासमोरील रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले होते. तेथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून त्यांनी फटाके लावले व मोठमोठ्याने घोषणा केल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला व फटाके वाजवून शांततेचाही भंग केला. म्हणून तुकाराम चंद्रकांत साईल, श्रीपाद पुंडलिक तवटे, शुभम दिलीप राणे, मनोरंजन नारायण सावंत, विनोद विजय सावंत, विनायक जनार्दन अणावकर यांचे वर भा.द.वी. कलम 143 व 149 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्ह्याचा ठपका ठेवलेला होता.
सदर कामी वरील नमूद 1 ते 6 आरोपींचे विरुद्ध सबळ पुरावा आला नसल्याने मे. मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब ओरोस श्री. ए. एम. फडतरे यांनी सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख व ॲड. मनीषा नरे यांनी काम पाहिले.