*माणसाच्या जीवनात ‘विवेक’ हा कणाच होय. हा विवेकाचा कणा जर मोडला तर माणसाचे जीवन मोडीत निघाल्याशिवाय रहाणार नाही. चांगले काय, वाईट काय, बरे काय, बुरे काय, कल्याणाचे काय किंवा अकल्याणाचे काय, सुख देणारे काय किंवा दुःख देणारे काय, यांची योग्य ती निवड करण्याची क्षमता असणे, यालाच ‘विवेक” असे म्हणतात.विवेकाचे महत्त्व लोकांना न समजल्यामुळेच सर्वत्र दुःख, कलह, तंटे-बखेडे व दंगे-धोपे होत असतात. वाचन, श्रवण आणि चिंतन यांच्या त्रिवेणी संगमातून विवेकाचा उदय होतो. थोडक्यात, विवेकाशिवाय माणसाचे जीवन अर्थशून्य होय.*
🎯 *“विश्वात एकच आहे व एकच विश्वरूप आहे”, अशा बोधाला विवेक म्हणतात.*
🎯 *करण्यात असावा विवेक व भोगण्यात असावे वैराग्य.*
🎯 *विवेक माणसाला समाधानाच्या शिखरावर नेऊन सोडतो, याच्या उलट अविवेक माणसाला आपत्ती-विपत्तीच्या दरीत ढकलून देतो.*
🎯 *सामर्थ्याचे अधिष्ठान असल्याशिवाय सत्याला सत्यपण प्राप्त होत नाही.*
🎯 *अति तेथे माती व मति तेथे मोती.*
🎯 *जो सहा विकारांचा वध करण्यास तत्पर तो सावध.*
🎯 *नाही ज्याला फिकीर तो जाणावा फकीर.*
🎯 *आग्रह हा सर्वात मोठा दुष्ट ग्रह होय.*
🎯 *अयोग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला ‘खुळा’ करते, तर योग्य ठायी स्थिर झालेली श्रद्धा माणसाला ‘खुदा’ करते.*
🎯 *’सर्व एकादश इंद्रिायांना देवाची एकच दिशा दाखवीत रहाणे’ याला खरी एकादशी म्हणतात.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏