You are currently viewing पौर्णिमेचं पडल चांदणं

पौर्णिमेचं पडल चांदणं

जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखीत अप्रतिम काव्यरचना

पौर्णिमेचं पडल चांदणं

पौर्णिमेचं पडलं चांदणं
कोजागिरीच हेच सांगनं

बंधुभाव प्रेमाचं
नातं जपणं
खेळ खेळून सर्वांनी
रात जागणं
पौर्णिमेचं पडल चांदणं
कोजागिरीच हेच सांगणं

पावभाजी वडापाव
मेजवानी खमंग
खमंग तापले दुध
त्यात पडल चांदणं
शितल किरण
आरोग्यास मस्त चांगलं
पौर्णिमेचं पडलं चांदणं
कोजागिरीच हेच सांगणं

नाती आपुलकीची
हळुवार जपणं
मायेच्या सागरात
मनसोक्त डुबन
पौर्णिमेचं पडलं चांदणं
कोजागिरीचं हेच सांगन

विसरू दुःख सारे
आनंदात हसन
सहकाऱ्याचा देऊन हात
सुखात जगणं
पौर्णिमेचं पडलं चांदणं
कोजागिरीच हेच सांगणं

सौ भारतीय वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा