*लालित्य नक्षत्रवेल साहित्य समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ अचला धारप लिखित अप्रतिम लेख*
*कोजागिरी पोर्णिमा*
‘शरदाचे चांदणे शिंपित रात्र आली
टिपुर चांदण्यात न्हाऊन कोजागिरी पोर्णिमा आली.’
खर तर प्रत्येक पोर्णिमेला पुर्ण चंद्र दिसतो.पण कोजागिरी पोर्णिमाला चंद्राचा वेगळाच थाट असतो. चंद्राच्या शीतल प्रकाशाने सारी सृष्टी न्हाउन निघते.आकाशात चंद्र सगळ्या चांदण्यांमधे खुलून दिसतो.आकाशात तो चंद्र आणि चांदण्या जणू रासक्रिडेत दंग आहेत असा भास होतो.
समुद्र किनारी तर पोर्णिमेच्या रात्री फिरण्याची मजा वेगळीच! आकाशातल्या चंद्राचे ते समुद्राच्या लाटांवरच प्रतिबिंब न्याहळत ; समुद्राच्या पाण्यात लाटांबरोबर खेळताना तुषार अंगावर उडाले की मनात सुध्दा आनंदाची कारंजी थुईथुई करतात.
खरतर चंद्राशी आपल जन्माला आल्यापासुनच नातं जुळतं.लहानपणी आई बाळाला झोपवताना अंगाई म्हणते
*लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई*
तेव्हा या चंद्राची नी आपली ओळख होते.मग थोडे मोठ झाल्यावर हाच चांदोबा घास भरवताना येतो.
*चांदोबा चांदोबा भागलास का?लिंबोणीच्या झाडामागे लपलास का*
असं म्हणत या चांदोमामाशी गट्टी जमते.
थोड मोठ झाल्यावर चाॅकलेटच्या बंगल्यात सुध्दा हा चंद्र भेटतोच.
*चांदीच्या झाडामागे चांदोबा रहातो, छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो.*
मग जरा मोठ झाल्यावर मामा बाराखडी शिकवतो तेव्हा सुध्दा हा चंद्र बाराखडीत पण हजर!
*प प पतंग, आभाळात उडे*
*ढ ढ ढगात, चांदोबा दडे.*
मग अश्या ह्या चांदोबाच्या गाण्यांमधे रमलेल्या मुलांना पाहून आईला वाटायच की घरात हे हसरे तारे असताना मी नभाकडे कशाला पाहू?आणि मग ती म्हणायची,
*वैभव पाहून मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे*
*मी पाहू कशाला नभाकडे.*
शाळेत गेल्यावर देशभक्ती गीतात सुध्दा हा चंद्र आहेच.
*गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे*
*आणिन आरतीला हे चंद्र, सुर्य तारे.*
अस म्हणत मोठा झालेल्या दादाला ताई वहिनी आणायला सांगते आणि वहिनीच कौतुक करताना ही ताई म्हणते,
*वहिनीला बसायला चांदोबाची गाडी*
*चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी.*
मग हे प्रेमवीर सुध्दा
*चंद्र आहे साक्षीला*
म्हणत प्रियकर प्रेयसीला साथ देण्याचे वचन देतो. गाठीभेटी होत राहतात.रोज भेटत असले तरी चांदण्या रात्री प्रेयसीचा हात हातात घेऊन तो म्हणतो,
*हात तुझा हातात आणि धुंद ही हवा*
*रोजचाच चंद्र आज भासतो नवा*
तर कधी हा प्रियकर म्हणतो,
*नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी*
*मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी.*
तर जुन्या नाटकात नायक म्हणतो,
*उगवला चंद्र पुनवेचा, मम ह्रदयी दरिया उसळला प्रीतीचा.*
अशी गाणी गात गात पुढे हे प्रियकर आणि प्रेयसी लग्न बंधनाने एकत्र येतात.तिथे सुध्दा *मधुचंद्र*
किंवा *हनीमून* म्हणत हा चंद्रच सोबत असतो.मग या मधुचंद्राची मजा अनुभवल्यावर तो तिला म्हणतो,
*शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी*
*आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळही रहा*
अस म्हणत सुखाचा संसार करतात.मग कधी तरी म्हटल जात
*तोच चंद्रमा नभात तिच चैत्र यामिनी*
*एकांती मज समीप तीच तूही कामिनी.*
पुढे वर्षे सरतात आणि हा हा म्हणता ८० वर्षे पूर्ण झाली की
*सहस्र चंद्र दर्शन* सोहळा होता.
असा हा चंद्र आपला लहानपणापासुनचा *सखा*
तेजस्वी,शीतल प्रकाश देत टिपुर चांदण्यात खुलुन दिसतो.
चंद्राची कोर सुद्धा छान दिसते. त्या चंद्रकोरची भुरळ स्त्रीयांना होते.म्हणून कपाळावर चंद्रकोर च्या आकाराच कुंकू लावतात आणि ललना खुलुन दिसतात.
एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला चंद्रावर नेण्याची स्वप्न दाखवायचा.ती स्वप्न फोटो स्टुडिओ मधे पूर्ण होत होती.पूर्वी फोटो स्टुडिओ मधे चंद्राची प्रतिकृती असायची.त्या चंद्रासोबत फोटो काढत होते.स्त्रीच चांदण्यातल डोहाळे जेवण करतात तेव्हा सुध्दा चंद्रकोरीची प्रतिकृती तयार करुन त्यासोबत तिचा कौतुक सोहळा होतो.
अशा या चंद्राचा *कोजागिरी पोर्णिमेला* वेगळाच थाट असतो. चंद्राच हे सौंदर्य बघुन ,शीतल चांदण्याची मजा घेत खर तर मसाला दूध पिऊन कोजागिरी साजरी करायला हवी.
*को जागरी* विचारत लक्ष्मी येते असं म्हटल जात. तर याच पावित्र्य राखल पाहिजे.
सौ.अचला धारप,रोहा जि.रायगड
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*
*Advt link*