You are currently viewing भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा..

भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा..

माजी खास. निलेश राणेंसह‌ शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती

 

कुडाळ :

 

भाजपाचे युवा नेतृत्व व युवा उद्योजक श्री विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात व विविध शैक्षणिक आणि समाजपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. श्री. परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खास. निलेश राणेंसह शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

12 ऑक्टोंबर 2022 सायंकाळी 7.00 वाजता जिल्हास्तरीय विशाल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आकर्षण बॉडी बिल्डर प्रदर्शन मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे होणार आहे.

बांद्यातील ओवेस कॉम्प्लेक्स, कट्टा कॉर्नर येथे 13 ऑक्टोंबर 2022 सायंकाळी 7 वाजता महा डबलबारी सामना बुवा श्री. गुंडू सावंत विरुद्ध बुवा श्री. संदीप लोके आयोजित केला आहे.

तर कै. श्रावण धुरी यांच्या स्मरणार्थ केसरकर हॉल माणगाव, तिठा येथे 14 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता महाआरोग्य शिबिर चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील शाळेत 14 ऑक्टोंबर 2022 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

तसेच कुडाळ नवीन एसटी स्टँड जवळ येथे 15 ऑक्टोंबर 2022 सायं. 5 ते 7.30 वाजता संगीतकार अजित कडकडे यांचा संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर रात्री 7.30 ते 8.15 वाजता युवा नेतृत्व विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे. रात्री 8.15 ते 8.30 पांढरी काठी दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोंबर 2022 रात्री 8.30 ते 10.00 वाजता सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे. रात्री 10.00 ते 12.00 सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाडा होणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल समवेत, संजू परब, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, बाबली वायंगणकर, साई भोई, अमित परब, अमित तावडे, जयेश चिंचोळकर, प्रणव वायंगणकर, निखिल कांदळगावकर, मंगेश चव्हाण, आकलाद शेख, प्रसन्न गंगावणे आधी उपस्थित होते.

तरी या कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा