You are currently viewing वनहरिणी

वनहरिणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा तांबे लिखीत अप्रतिम गझल*

*वृत्त – वनहरिणी*

(मात्रा- ८+८+८+८)

डोळ्यामध्ये तुझ्या गुंतले कशी राजसा कळले नाही,
वाटेवरुनी प्रेमाच्या मग उलट कधी मी वळले नाही…

प्रेमामध्ये शक्ती असते याचा प्रत्यय आला जेव्हा,
विरोधकांनी नाद सोडला पुन्हा कधीच छळले नाही…

प्रेमरसाची अमृतधारा जीवनभर मज सुखवत गेली
पवित्र झाले मानस आता परत कधीही मळले नाही …

प्रेमाची ही नशा आगळी धुंदी त्याची चढतच गेली,
मद्याची चव घेण्यासाठी हात कधी सळसळले नाही….

अशी बुडाले प्रेमामध्ये झाली तृप्ती याची देही
जगी पाहुनी दुसऱ्याचे सुख रेखाचे मन जळले नाही…

©® सौ. रेखा तांबे.
वडोदरा.

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + nineteen =