मंत्री दिपक केसरकरांची हजेरी; गुणवंत विद्यार्थ्यांसह यशस्वी अधिकार्यांचा होणार गौरव
सावंतवाडी
सिधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या अधिकारी व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उद्या ९ ऑक्टोबरला कळसुलकर हायस्कुल हॉल येथे सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, सुजीत जाधव, आत्माराम ओटवणेकर, रवीकिशोर चव्हाण, अॅड. अनिल निरवडेकर, लक्ष्मण सरंबळकर, राजन चव्हाण, डॉ. शरद जाधव, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पदाधिकार्यांच्यावतीने करण्यात आले आहे.