ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासासाठी बँ नाथ, पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने वेगवेगळे योगदान दिले आहे. मात्र, आता जिल्ह्याच्या सर्वकष विकासाचे धोरण ठरवून त्यानुसार विकास अपेक्षित आहे. येथील तरुण नोकरीसाठी स्थलांतरीत होण्यापासून थाबविण्यासाठी टाईम बाँड प्रकल्प राबले पाहिजेत. पर्यटकांना अपेक्षित असलेले पर्यटन प्रकल्प राबले पाहिजेत, त्या दृष्टीने आपला प्रयत्न सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवून राहणार असल्याची ग्वाही नूतन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पालकमंत्री चव्हाण यांनी सावंतवाडी व कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचा आढावा भाजप पदाधिकारी यांच्याकडून घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, नेते दत्ता सामंत, सरचिटणीस प्रभाकर धुरी, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, रणजित देसाई, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, दादा साईल, राजू राऊळ, प्रकाश मोर्ये यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.