You are currently viewing सहवास

सहवास

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*सहवास ….*

प्राजक्त सांडला खाली माती झाली सुगंधी
सहवास लाभताच नामी किती ही संधी…

चंदन परिमळे तो तो धुंद आसमंत
वाऱ्यास लपेटून गाठतो पहा दिगंत..

सहवास साधूचाही किमया अशी करे का
सत्संग लाभताच”माणूस” तो बने का ?

सहवास , जीवनात तुम्ही कुणाच्या सहवासात येता ही
विधीलिखिताची गोष्ट असली तरी काही ठिकाणी ठरवले
तर जाणिवपूर्वक तुम्ही सहवास निवडू शकता.अर्थात ही
फार कठिण गोष्ट आहे. आजकाल अगदी अशक्य अशा
गोष्टी टी व्ही मोबाईल मुळे आपल्याला बघायला मिळतात.
माणसाचे जाऊ द्या, अगदी स्वभावच:च वैर असलेले पशु पक्षी
गुण्यागोविंदाने एकत्र नांदतांनाचे अनेक व्हिडिओ प्रसार
माध्यमांमध्ये फिरतांना आपल्याला दिसतात व आपल्याला
नवल वाटते. की, इतके विरोधी स्वभावाचे प्राणी कसे काय
असे गुण्यागोविंदाने राहू शकतात ?

तर हा अगदी लहानपणापासूनचा सहवास हे शिकवतो.
जे लोक ही किमया करून दाखवतात ते खरोखर धन्य होत.
कारण अगदी लहानपणीच या सवयी लागू शकतात व ती
मंडळी त्या पशुपक्ष्यांना तसे घडवतात . म्हणजे पशुपक्ष्यांमध्ये
जर असे घडत असेल तर माणसांच्या बाबतीत तर नक्कीच
घडायला हवे, नाही का? चंदनाच्या सुवासाने आसमंत दरवळतो,रातराणीची झुळूक मन वेधून घेते , पारिजातकाचा
सुवास मातीला लागतो व माती गंधित होते ही उत्तम सहवासाची उत्तम उदाहरणे आहेत. म्हणजे उत्तम सहवास तुम्हाला उत्तम माणूस बनवू शकतो.सर्वात पहिला व अनमोल सहवास म्हणजे जन्मत:च आईचा लाभलेला सहवास! पहिल्यांदाच तिने पोटाशी धरताच बाळाला जे त्रिभुवनाचे सुख प्राप्त होते त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. हा सहवास आपल्याला घडवतो,माणूस बनवतो व जगण्याला लायक बनवतो.या सुखाला जे वंचित होतात त्यांच्यासारखे अभागी तेच कारण आईची तुलना झालीच तर ती फक्त देवाशीच होऊ शकते.

मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत
नाही.तो जन्मतो तोच गोतावळ्यातच. अनेक हातांनी त्याचे
संगोपन होते.अनेकांचा सहवास त्याला मिळतो व तो घडत जातो. परिस्थिती व पर्यावरणाचे संस्कार त्याच्यावर होतात.
त्यातून तो सवत:ला वेगळे करूच शकत नाही.झाडे पाने फुले
माणसे पशु पक्षी किटक फुलपांखरे मुंग्या माशा इ. चा सहवास जन्मापासून त्याला घडतो व या साऱ्यांकडून अनुभवाचे
संचित घेऊनच त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. या सर्वांपासून
तो स्वत:ला वेगळे काढूच शकत नाही इतके त्याचे सहजीवन
भोवतालच्या परिस्थितिशी एकरूप झालेले असते.किंबहुना
भोवतालच्या परिस्थिती शिवाय तो स्वत:ची कल्पनाही करू शकत नाही, क्षणभर कल्पना करून पहा, आजूबाजूला झाडे
व पक्षी नाहीत? लगेच वैराण वाटायला लागते. पक्ष्यांना झाडांना पाहूनच मन सुखावते.झाडांची विविधता मन रंजवते.

साधू संतांचा सहवास लाभणे ही तर फारच दुर्मिळ गोष्ट
आहे.प्रसार माध्यमांचा सुळसुळाट जेव्हा नव्हता तेव्हा आमच्या
लहानपणी ठिकठिकाणी संतांची, स्री संतांची प्रवचने होत असत. संध्याकाळी दवंडी पिटवली की रात्री चौकात अख्खा
गाव गोळा होत असे व पहाटे पर्यंत मोठ्या मनोभावे पुराणातल्या दाखल्यासह दिलेले ते प्रवचन ते अख्खा गांव
ऐकत असे. कदाचित त्याचाच परिणाम असावा की समाज
नीतिमान होता. पापभिरू होता. विवेक बाळगून होता.आज
हे सारे लोप पावले आहे. व समाज वहावत जातो आहे असे
आपल्याला दिसते.

थोडक्यात, तुमच्या जीवनात तुम्हाला मिळालेला सहवास हे
एक मोठे परिमाण आहे, जे तुमच्या जीवनाला सुकाणू सारखे
दिशा देऊ शकते. त्या अर्थाने पत्नीला पतीचा मिळालेला सहवास दोन्ही प्रकारे काम करू शकतो. जीवन उजळून टाकू
शकतो किंवा जीवन बरबादही करू शकतो. दारूड्या नवऱ्याचा
सहवास बायकोचे काय कल्याण करणार हो? तसेच दारूड्या
मित्राचा सहवास मित्राचे काय कल्याण करणार ? म्हणून नेहमी सहवासात असणारे मित्र ही आपण पारखूनच घ्यायला
हवेत नाही का? काही लोकांचे तर मित्रा शिवाय पान हलत नाही म्हणजे मित्राची जबाबदारी किती वाढली पहा?
सूर्य चंद्र तारे वारे नक्षत्रे नद्या तळी सागर मोकळे आकाश या
साऱ्या घटकांचा सहवास आपले जीवन सुंदर बनविण्यास
मदत करतात हे नक्कीच!

तर … सहवासा शिवाय जीवनाची आपण कल्पनाही करू
शकत नाही हे अगदी खरे आहे ना? …

धन्यवाद मंडळी ….

ही फक्त माझी मते आहेत ..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ५ ॲाक्टोबर २०२२
वेळ : दुपारी १२/१७

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा