*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*
**अन्न दाता सुखी भव**
“” पिक शेतात शेतकरी बांधावर आणि पिक पाहणी करणारे अधिकारी व कर्मचारी एसी मध्ये मग झाली पिक पाहणी “”
आपणं अनेक ठिकाणी वाचलं आहे की आपली पृथ्वी शेषनानाचया फणावर तरली आहे . हे सत्य नसून आपली पृथ्वी व पृथ्वीवर असणारे सर्व जीवजंतू हे हे आपल्या शेतात ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता राबणाऱ्या बळिराजा यांवर तरली आहे .
वेळोवेळी येणारे पूर २००५/ २०१४/ २०१९/ या अनेक सालात आलेले पूर आपणं पाहिले नाहीत त्यांचा खरा भयानक अनुभव आपल्या बळिराजाने भोगला आहे. पाण्याखाली जाणारी शेती. पूरात वाहून जाणारी शेत जमीन. एवढंच काय पण अवेळी अवकाळी पडणारा पाऊस त्यामध्ये पिकांचे. घरांचे. जनावरें. यांच भयानक असं नुकसान कायमचं शेतकरी यांना भोगावे लागते.
बी बियाणे. खते. विविध शेती औषध. शेतीची पेरणी पासून काढणी पर्यंत येणारा खर्च. मजूर खर्च. हे आज शेतकरी लोकांना परवडत नाही आणि त्यातच निसर्ग अवकृपा वेळोवेळी होत असते . त्यातच शेतीत कष्टाने पिकविलेल्या मालाला कवडी मोल भाव . जागोजागी मार्केट यार्ड मधील खरेदी साठी उभे असलेलें कारखानदार यांनी तयार केलेले दलाल एजंट हे शेतकरी यांना भावात वजनात लुटत आहेत.
सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांच्या विविध समस्या व्यथा कथा आणि यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत हे ध्यानात आल्यावर शेतकरी लोकांच्या साठी शेतकरी सन्मान योजना. पिक साठवण संरक्षण योजना. शेतीमालाला रास्त भाव. शेतकरी ते ग्राहक. पिक पाहणी. अशा विविध योजना राबविण्यात आल्या पण त्या शेतीशी निगडित असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथानपणा पणामुळे खरोखरच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. ज्याचे शेती. घर. जनावरें. व्यक्तिगत. कसलाही नुकसान होत नाही त्यांनाच लाभ होत आहे. शेतकरी सन्मान योजनेचे पैसे कमी क्षेत्र असणारे शेतकरी यांना देणे बंधनकारक आहे. पण आज ज्यांचे क्षेत्र एक हेक्टर पुढे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.
वेळोवेळी आलेल्या पूरातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना राॅकेल. डाळ. गहू. तांदूळ. सानुग्रह अनुदान. अशा विविध योजनांचा लाभ कोणत्याही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही मग हे अनुदान गेलं कुठ??
जिल्ह्यात सुमारे 9 लाख 97 हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यांच्याकडील 10 लाख 80 हजार शेत मिळकतीच्या सात-बारा उतार्यांवर ई-पीक पाहणी नोंद होणार आहे. राज्य शासनाने पारंपरिक पीक पाहणी नोंदणी बंद करून ती मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने (ई-पीक पाहणी नोंदणी) सुरू केली आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्यावर्षी त्याला कमी प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी केवळ 26 हजारांवर शेतकर्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी केली.
यावर्षी सर्वच शेतकर्यांकडून ई-पीक पाहणी नोंदणी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक गावातील 25 ते 30 या वयोगटातील तरुणांचा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना, तरुणांना मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी नोंदणीच्या अॅपची कशी हाताळणी करायची, त्यानुसार ऑनलाईन पीक पाहणी कशी करायची, त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
सरकारनं शेतकरी लोकांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पिक पाहणी ही शेती अधिकारी व कर्मचारी यांनी शेतात जाऊन बांधावर उभ न राहता शेतात चिखलात फिरून पिक किती पाण्यात बुडले आहे. पिकाला उतारा आहे कां?? . पिकांवर किड रोग आहे कां?? पिकांसाठी कोणते बी बियाणे कोणत्या कंपनीकडील आहे?? पिकांसाठी कोणते खत वापरले आहे ?? हा सर्व अहवाल एसीत बसून तयार करायचा नाही किंवा मोबाइलच्या फोटो पाहून करायचा नाही तर सवता चिखलात फिरून करायचा आहे . शासकीय शेती अधिकारी व कर्मचारी यांना जमतं नसेल तर त्यांना कामावरून कमी करण्यात यावे.
प्रशिक्षित तरुणांना त्यांच्या स्वत:च्या गट क्रमांकासह त्यालगतचे भौगोलिक क्षेत्राचे गट करून तो गट एका विद्यार्थी अथवा तरुणाकडे दिला जाणार आहे. यामुळे एका तरुणाकडून किमान 10 ते 15 गट क्रमांकाची ई-पीक पाहणीची नोंदणी होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे. महाविद्यालयांत तसेच गावांत तलाठ्यांसह महसूल अधिकार्यांकडून प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे
या ई-पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्टपासून राज्यभर करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली असून पीकपेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीकविमा व पीकपाहणी दावे निकालात काढण्यासाठी या ॲपचा चांगला उपयोग होणार आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा थेट सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.
पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीकविमा आणि पीकपाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, ई-पीक पाहणी मुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर
गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते. त्यात बरोबरीने सातबारा उताऱ्यात गावाचा नमुना नंबर 6 अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. ‘गाव नमुना 7’ हे अधिकारपत्रक आहे व ‘गाव नमुना 12’ हे पीक-पाहणी पत्रक आहे.
जमीन व महसूलीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाठ्याकडे हे ‘गाव नमुने’ असतात. या नमुन्यांमध्ये भरलेल्या अद्ययावत माहितीमुळे शेतकऱ्याचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी तसेच दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी पीक पाहणीची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, अशा शेतकऱ्यांना नेहमीच अडचणी येत होत्या. पीक पाहणीच्या चुकीच्या किंवा वेळेत न झालेल्या नोंदीमुळे या शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पीक कर्ज किंवा कर्जमाफीचा लाभ घेता येत नव्हता. ही बाब लक्षात घेता आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1971 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके (register books) आहेत. या नोंदवह्यांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं 7 आणि ‘गावचा नमुना’ नं 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. पूर्वी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. एकाच तलाठ्याकडे चार ते पाच गावे असल्याने तो तलाठी कधी येईल आणि आपला सातबारा कधी मिळेल याची आतुरता प्रत्येक शेतकऱ्याला असायची. सातबाऱ्यावरील विविध नोंदींमुळे शासनाच्या योजना, दाखले मिळविण्यासाठी 7/12 हा महत्त्वाचा ठरतो.
सातबारा पाहून काय पिक शेतात आहे हे कळतं कां?? शेतकरी सांगतो आणि तुम्ही एकूण पिक पाहणी अहवाल तयार करता हे योग्य आहे का??आजच शेतकरी यांनी शेती अधिकारी तलाठी यांना आपल्या शेतात घेऊन जा आणि आपल्याला पिक तयार करताना काय हाल होत ते हे आयीत गबबू अधिकारी शासनाचा एसीत बसून पगार घेतात त्यांना कळू दे म्हणूनच यांना शेतात येऊन पिक पाहणी करण्याचा आग्रह धरा.
सत्ताधारी सरकारने पिक पाहणी ही शेतात जाऊन करण्यात यावी असा आदेश काढणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859
Advertisement
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*