You are currently viewing ६ ते १० ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

६ ते १० ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई  :

६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत मुंबई – परळ येथील ‘दि सोशल सर्व्हिस लीग’ या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सव कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल अशी माहिती दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी दिली. दि सोशल सर्व्हिस लीग ही मुंबईतील १११ वर्ष जुनी सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाचे हे शताब्दी वर्ष आहे.

यानिमित्ताने संस्थेच्या परळ येथील ना.म.जोशी विद्यासंकुलात गुरूवारी ६ ऑक्टोबरला सकाळी १० वा. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा व यनिमित्ताने अद्वैत ही एकांकिका सादर होईल. ४ वा. एकांकिका बक्षिस व सत्कार समारंभ तर सायंकाळी ७ वा. श्रीसिद्धिविनायक दशावतार मंडलांचे दशावतार सादर करतील. शुक्रवारी ७ ऑक्टोंबर रोजी स.१० वा. संस्थेचा “विद्यार्थी कलारंग” कार्यक्रम तर सायं.४ वा. लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचे “खरा ब्राम्हण” यावर साजरी मनोरंजन मंडळाचे नाटक सादर होईल.

खेड येथील शाहीर राजेश निकम यांचे शक्ती व लांजा येथील तुरेवाले यांचा नाच रात्री ७.३० वा. होईल. शनिवारी ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वा. कविवर्य नारायण स्मृत्यर्थ काव्यवाचन होईल. यामध्ये अरुण म्हात्रे, रामदास फुटाणे, प्रज्ञा पवार, भाई मयेकर व महेश केळुसकर सहभागी होतील. तसेच सायं.४ वा. “सरनोबत” हे ऐतिहासिक नाटक होईल.रात्री ७.३०.वा.लोकसंगीत होणार आहे. रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी लेखक डॉ.प्रा.प्रदीप ढवळ यांचे शिवबा हे नाटक सकाळी १० वा. होईल. उदय साटम यांच्या संकल्पनेतून “मराठी पाऊल पडते पुढे” हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन परिसंवाद सकाळी १० वा. होणार आहे. ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या महोत्सव कालावधीत रंगावली प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

या संपूर्ण शताब्दी महोत्सवाचे समन्वयक म्हणून श्रीमती उमा शरद शेट्ये, राजन शंकर बने व हेमंत सुधाकर सामंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा