You are currently viewing आधुनिक दुर्गा

आधुनिक दुर्गा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*आधुनिक दुर्गा*

स्त्रीवर करू नका
कोणताही अत्याचार,
स्त्री असते मुळात
दुर्गेचा अवतार..।

उपासक नि पूजक
असते ती शक्तीची,
तीला असते प्रतिक्षा
अपुल्या मुक्तीची..।

आधुनिक दुर्गा आई
पत्नी बहिण मुलगी,
तरी समाजात दिसते
मुलासह सलगी..।

स्त्रीला व्यक्त व्हायला
मिळत नाही संधी,
पुरूषांच्या आज्ञेची
ती असते पहा बंदी..।

मुकाट सहन करते
जणू काही अबला,
मुळात असते ती
शक्तीमान सबला..।

या शक्तीचा सर्वांनी
करावा आदर,
नम्रपणे तिच्या
समोर व्हावे सादर..।

खवळली तर भरती
येईल सागराला,
रागात नका आणू
या शक्तीच्या आगाराला..।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा