*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखीत अप्रतिम लेख*
*मनामनातील रावण*
नवरात्र संपलं. आज विजयादशमी… शत्रूवर विजय मिळवल्याचा दिवसाचे, विविध कथा, आख्यायिका यांचे स्मरण करून देणारा दिवस…
आज सर्वजण एकमेकांना भेटतील, दसऱ्याच्या शुभेच्छांसोबत आपट्याची पानं, ती न भेटली तर कांचनाची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतील…पर्यावरण वाचवायच्या नावाखाली कोणी कोणी विनोदाने सोन्याच्या पानाचीही मागणी करतील…झेंडूची फुलं, आंब्याच्या पानांचे तोरण आणि घटासमोर उगवलेलं धान्यांकुर यांचाही मान अबाधित आहे.
मोठमोठ्या शहरात बरेच जण आज गेट-टुगेदर करतात. त्यानिमित्ताने एरवी न होणाऱ्या एकमेकांच्या भेटीगाठी होतात…मनोरंजनाचे खेळ, स्पर्धा याचे आयोजन केले जाते. एकंदरीत दिवस मजेत जातो.
पूर्वीचे लोक कदाचित घोडे हेच त्यांचं वाहन असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा करत असतील आता घोड्यां ऐवजी गाड्या आल्यात आणि त्यांनाही पूजा करून घेण्याचा सन्मान लाभलाय.
शिवाय वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या प्रांतात आणखीही बऱ्याच काही प्रथांचे वैविध्य असेलच.
अशीच एक प्रथा मात्र अद्यापही अव्याहत सुरू आहे. रावणदहन…आबालवृद्धांना आवडणारी…शक्य तितक्या उंचीचा रावणाचा पुतळा तयार करायचा आणि मोठ्या जल्लोषात एखाद्या मैदानात त्याचे दहन करायचे…त्यावेळी गर्दीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. हजारो वर्षांपूर्वी रावणाने सीतेला फक्त उचलून नेण्याचा एक गुन्हा केला, नंतर त्याने तिला तिची परवानगी नसतांना साधा स्पर्शही केला नाही…पण तरीही तो वर्षानुवर्षे जळतोच आहे आणि यापुढेही जळतच राहील. ठाऊक नाही किती युगापर्यंत…
आता अशा कितीतरी सीता कधी एकट्या दुकट्या तर कधी सामूहिकरित्या रावणांकडून उचलल्या जात आहेत आणि……..त्यांच्याचकडून जाळल्याही जात आहेत…रावण दहन साजरा करत असणाऱ्या गर्दीतल्या प्रत्येक पुरुषाने कधी स्वतःच्या मनात डोकावून पाहिलंय का? प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्याच्या मनात कधी स्त्रीबद्दल वाईट विचार आलेच नसतील? या मनामनात राहणाऱ्या रावणाचं कधी होणार दहन नेहमीसाठीच? लंका तर खूप दूर आहे, इथे तर पावलोपावली रावण भेटत असतात त्याचं काय! असं म्हणतात की *शीशे के घर मे रहनेवालोंने दुसरों के घरपर पत्थर नही मारने चाहिये.*
सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
५-१०-२२
विजयादशमी
Advertisement
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*