You are currently viewing फोंडाघाट येथे सिमेंट भरलेला ट्रक पलटी…

फोंडाघाट येथे सिमेंट भरलेला ट्रक पलटी…

कणकवली

तालुक्‍यातील फोंडाघाट येथील पिंपळवाडी दरम्‍यान सिमेंट पोती भरलेला ट्रक अपघातग्रस्त झाला. खड्डेमय रस्त्यामुळे या ट्रकचे पुढील व्हील एक्‍सल तुटले आणि ट्रक लगतच्या शेतामध्ये पलटी झाला. यात ट्रक चालकाला गंभीर दुखापती झाल्‍या आहेत.

कोल्‍हापूर येथून फोंडाघाट कणकवली मार्गे गोवा अशी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (एमएच ११ अेएल ५०२०) हा फोंडाघाट सोडल्‍यानंतर पिंपळवाडी येथे आला असता ट्रकचा पुढील व्हील एक्‍सल तुटला. त्‍यानंतर लगतच्या शेतात ट्रक पलटी झाला. सकाळी नऊ वाजण्याचा दरम्‍यान ही घटना घडली. ट्रक पलटी झाल्यावर सिमेंटच्या बॅगा लगतच्या शेतात विखुरल्या तसेच. डिझेलची टाकी फुटल्‍याने डिझेल वाहून गेले.

या अपघातात ट्रक चालकाच्या डोक्याला जखमा झाल्या झाला. त्‍याला उपचारासाठी पोलिसांनी रिक्षातून फोंडाघाट प्राथमिक आरोग्‍य केंद्रात पाठवले होते. मात्र दुपारपर्यंत ट्रक चालक प्राथमिक आरोग्‍य केंद्राऐवजी अन्यत्र गेल्‍याने त्‍याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

दरम्‍यान कणकवली फोंडाघाट मार्गावर आयटीआय ते साईमंदिर आणि चेकपोस्ट ते घाट रस्त्यावर पिंपळवाडी येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात वाहन चालकाला कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. आज झालेला अपघात, मोठ्या खड्ड्यामुळे, पॉवर व्हीलर एक्सेल तुटल्याने झाल्‍याची चर्चा स्थानिकांत होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा