नववी माळ
श्री सिद्धिदात्री नमः
सिद्ध गंधर्वयक्षा द्ययीर सुरैरपी मरैरपी l सेव्यमाना सदा भूयात सिद्धीदायीनी ll
भगवती दुर्गा मातेच्या नवव्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहें. ही आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी देते, म्हणून हिला सिद्धीदात्री म्हणतात.नवरात्र उपासनेत नवव्या दिवशी यां देवींची सेवा, आराधना केली जाते, हिची उपासना केल्याने भाविकांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मार्कंडेय पुराणात सांगीतल्या नुसार अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्रकाम्य, इशत्व, वरित्व यां आठ सिद्धी आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणात श्री कृष्ण जन्म खंड नुसार यां सिद्धी अठरा आहेत. देवी पुराणा नुसार श्री भगवान शंकरांनी यां सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या.असा उल्लेख आहें. यां सिद्धी प्राप्ती नंतर भगवान शंकराचे अर्धे शरीर नारीचे बनले त्या मुळे शंकराच्या यां रुपाला अर्धनारी नटेश्वर हे नाव प्राप्त झाले
मां सिद्धी दात्रीला चार भुजा आहेत. तिचे वाहन सिंह आहें. ती कामळावर विराजमान आहें. तिच्या उजव्या बाजूच्या खालच्या हातात तिने कमळ घेतले आहें.
नवदुर्गा मध्ये अंतिम देवी सिद्धिदात्री आहें. नवदुर्गाच्या पूजे नंतर भक्ता आणि साधकांची लौकिक आणि परलौकिक सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करते
यां देवी सर्व भुते्षु मां सिद्धिदात्री रुपेण संस्थीत:
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै ll
रंग गुलाबी
माळ लिंबाची माळ.
कल्पना तेंडुलकर
ओरोस.