बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध वाडीनिहाय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.यात प्रतिदिन श्री माऊली,ब्राह्मणी पंचायतन देवता़ची पुजा करणे.पुष्पहार घालणे.सकाळी,संध्याकाळी आरती करणे.भजन,किर्तन सादर करणे.भजनाची डबलबारी करणे..दशावतारी नाट्यप्रयोग सादर करणे.कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम सादर करणे.इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कुडाळ पिंगुळी येथील लोककला कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम श्री ब्राह्मणी,इश्वटी प्रासादिक भजन मंडळ, आंबेखणवाडी यांनी आज प्रायोजित केला होता.सदर ” कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील पिगुंळी येथील.लोककलाकार श्री परशुराम गंगावणे यांच्या सहकारी मंडळी यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यामुळे सदर मंडळाचा सन्मान डेगवे ग्रामस्थ व माजी सरपंच श्री मंगलदास देसाईयांच्या व शामसुंदर देसाई व इतर ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी डेगवे गावचे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई,इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विनय देसाई,सदानंद देसाई,शामसुंदर देसाई,दिपक देसाई,वामन देसाई,योगेश मांजरेकर,गोपाळ देसाई वासुदेव देसाई,उत्तम देसाई,बाबली देसाई,मधुकर देसाई सुर्याजी देसाई व इतर डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,गावातील मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमात डेगवे आंबेखणवाडी, फणसवाडी, जांभळवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी,वराडकरवाडी इत्यादी वाडी वस्ती वरील ग्रामस्थांच्या भजन मंडळांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण मंडळी,महिला यांची उपस्थिती उल्लेखनीय असल्याने नवरात्रातील वातावरण रममाण आहे.
*उल्हास देसाई*
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई