You are currently viewing वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन

कणकवली

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला. हा कार्यक्रम नवरात्र उत्सव 2022 निमित्त महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर *माता सुरक्षित तर घर सुरक्षित* या उपक्रमांतर्गत घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी तळरे गावच्या सरपंच साक्षी सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव यांनी किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल तसेच पोषक आहाराविषयी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी चरण मुकडे यांनी पोषक आहारा अभावी होणाऱ्या आजारांबाबत मुलींना जागृत केले. आरोग्य सेविका सुचिता तळेकर यांनी स्त्रियांचे शोषण,रक्तवाढ,पोषक आहार, मासिक पाळी,गुप्त आजार, कुटुंबातील महिला जागृती संदर्भातील मार्गदर्शन अशा विविध घटकांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.पी.गावठे व आभार प्रशालेची बारावी वाणिज्यची विद्यार्थिनी स्नेहल तळेकर हीने मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा