You are currently viewing डायरीतलं १ पान

डायरीतलं १ पान

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखीत अप्रतिम लेख*

*”डायरीतलं १ पान*
माझ्या आठवणीतलं गाव. *”वरणगाव फैक्टरी*”
*”लेखन सौ योगिनी वसंत पैठणकर** नाशिक.

भाद्रपद पौर्णिमेला सुरू होतो तो आमचा भोंडला,*”भुलाबाई* चा सण! आणि संपतो कोजागिरी पौर्णिमेला. हल्रीच्या मुलींना हा भोंडला,भुलाबाई कितपत माहिती आहे माहित नाही.. पण मी लहानपणी दरवर्षी हा खेळलाय, व मला मुलगा होता तेव्हा वाड्यात ही मी गुलाबाई मांडायची.
श्रावण संपला की आम्हा मुलींना वेध लागायचे ते या गुलाबाईचे. तेव्हा भुलाबाई की गुलाबाई हा शब्दांचा गोंधळ होता. पण तरी मैत्रीणींकडे जायला मिळणार हा आनंद त्यापेक्षा मोठा होता. टिपऱ्या माळ्यावरून काढून पुसल्या जात. इन में तीन-चार ड्रेस असायचे पण तेही स्वच्छ धुऊन घरच्या घरी इस्त्री केले जायचे. त्यालाच मॅचिंग कानातले किंवा बांगड्या शोधत. आणि मग या माहेर वाशीणींच्या स्वागतासाठी आम्ही मुली लगबगीने तयार व्हायचो. सखी पार्वती शंकर महादेव आणि तिचा मुलगा गणेश जी यावर आधारित ही सगळी गाणी तेव्हा तोंड पाठ असायची. माझ्या आजीने तर तिच्या हस्ताक्षरात वहीत लिहूनही ठेवलीहोती, आता वही नाही आणि आजी ही आस्तीत्वात नाही.
आमचे लहानपणाचे कॉलनी फारशी मोठी नव्हती… वरणगावला छोटे छोटे कॉटर्स असायचे… आणि प्रत्येक घरात जाणारी प्रत्येक मुलगी एकमेकांना ओळखत होती. इतकच काय त्यांच्या बांगड्या पैंजण किंवा बोलण्याच्या आवाज आवरून कोण आलं ते ओळखू यायचं. ईतका घरोबा,एकोपा होता, गुलाबाई पिक्चर मांडले जायचे आणि साऱ्याछोट्या मैत्रिणी मोठ मोठ्या आवाजात गाणीगायचो. कदाचित तीथूनच समूह गाणे एकत्र राहणं. ,शेअरींग सगळे शिकलो . शेवटी मजा येते खाऊ वरून.. विशिष्ट डब्यात. वेगळा करून शोधून शोधून आणावालागायचा… त्यासाठी काय न्यायचे यासाठी आईचे डोके दोन दिवस आधीच खाल्ले जायचे… आणि आई ते हट्ट पुरवायची. कुरमुरे चिवडा वड्या शेंगा,ईडली. शेव. बर्फी आळूवडी, राजगीरा लाडू किती पदार्थ! नापास झाले की सारी कॉलनी रंगीबेरंगी फुलपाखरांनी सजायची… सकाळीच फुल गोळा व्हायचे आणि डेकोरेशन काय काळजी घरातली नवी साडी पण त्या, दिवे ,बाहुल्या खेळणी! परकर पोलका घातलेल्या मुली उगाचच मोठ्या वाटायचे आणि भाव खायच्या. *”जीचा खाऊ भारी ती फुशारक्या मारी!**. पण सगळ्य जणी सगळ्यांकडे जायच्या. जातपातशब्द मनातही नव्हते आणि डोक यातही नव्हते …
साऱ्या स्त्रियांचभाव विश्व, संसाराची गोडी या गाण्यांमध्ये असायची. सासु सुनेचंप्रेमाचं नातं तेव्हाच मनात ठसवलं जायचं….. प्रत्येक पती-पत्नीचं नातं या गाण्यातून खुलायचं. गाणे आठवते ते आईला मला एक लिंबू बाई बाई अक्कण माती ,चीक्कण माती. शींक्यातलं लोणी. श्रीकांता कमलाकांता. यातला ठेका. रीदम, यमक मस्त. आड. बाई आडोनी. कारल्याची भाजी. पहीली ग भूलाबाई. ….. आमचा भोंडला संपला. … या साऱ्या स्त्रीच्या मनातल्या भावना व्यक्त होण्याच्या खूप मोठा सामाजिक संदेश होता. मी ,जयू, अपर्णा ,वैशू, चारू, उज्वला ,केतू ,संगीता, मनीषा ,निलू, ज्योती, तृप्ती, तेजू ,अनिता, आरती, माधुरी , कविता, कल्पना साऱ्यांनीच आठवणी खूप जपल्याआहेत. थोड्याशा खाऊ साठी किती किती लांब पायपीट केली. कित्येकदा माझा भाऊ पण सोबत यायचा त्याला सारे रागवायचे! कोजागिरीला दूध आटवणं हा सोहळा संपायचा खूप वाईट वाटायच! परत पुढच्या भुलाबाईपर्यंत प्रतीक्षा असायचे आणि वेध लागायचे परीक्षेचे …..कारण लगेच सहामाही परीक्षा असायची ;आता ती गंमतही नाही ;त्या आठवणी ही नाही आणि ती प्रतीक्षाही नाही परीक्षाही नाही !;सारच कसं ऑनलाईन; व्हाट्सअप मेसेज किंवा youtube च्या एका क्लिकवर हो ना ! थोडंसं कृत्रिम ,थोडसं इन्स्टंट, मी कालाय तस्मे नमः असं म्हणत मी अजूनही माझ्या वरणगावच्या त्या कॉलनीतच अधिक रमते आत्ताही……….!!

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा