कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो आणि जय आणि यश मिळविणारा धुरात उमाळे काढणारा आहेत पार्टनर..
संवाद मीडियाने जिल्ह्यात बसलेल्या प्रत्येक जुगाराच्या बैठकीची बातमी बैठक बसताच मीडियामध्ये दिल्याने हैराण झालेले जुगाराचे बादशाह काही दिवस सुरक्षित जागेच्या शोधात होतेच. कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो बरेच दिवस तळेरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगाराचा फड उभारण्याच्या तयारीस लागलेला होता. संधी मिळताच आज त्याने आपला जुगारातील पार्टनर ‘जय’ आणि ‘यश’ एकसाथ मिळवून ‘धु’ रातून उ ‘माळे’ याच्या साथीत कासार्डे येथे विधिवत पूजा करत जुगाराचा क्लब सुरू केला आहे.
“जय” आणि “यश” मिळविणारा “धु” रातून उ “माळे” काढणारा पार्टनर स्वतः पूजेला बसला होता. कासार्डे परिसरात पूजेला भटजी सुद्धा बाहेरून आणावे लागतात, त्यामुळे जोरदार पैशांची उधळण होणाऱ्या या धंद्यासाठी पूजा करण्यासाठी भटजींना देखील मोठी रक्कम दक्षिणा म्हणून देण्यात आली. आतापर्यंत जिथे जिथे बैठका बसल्या तिथे विघ्न आल्यामुळे बैठका उठवाव्या लागल्या. त्यामुळे विधिवत पूजा करून बैठकांमध्ये विघ्न येऊ नये असे गार्हाणे घालण्यात आले.
नव्या पूजा केलेल्या जागेवर आज संध्याकाळी जुगाराची पहिली मैफिल सजणार आहे. कणकवली, फोंडा, कुडाळ, बांदिवडे, सावंतवाडी पासून जिल्हाभरातील अट्टल जुगारी या बैठकीत आपले नशीब आजमावणार आहेत. जुगाऱ्यांना झारीतील शुक्राचारयांची साथ मिळत असल्याने जागा बदलून जुगाराच्या बैठका सुरूच असतात. ज्यात कित्येकजण घरातील वस्तू, दागदागिने विकून जुगारात आपले नशीब आजमावत असतात. परंतु तकशीम असणाऱ्या जुगाऱ्यांची मात्र त्यात चांदी(मोती) होते, आणि खेळणारे मात्र कंगाल होऊन जातात.
जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भविष्यात सहज मिळालेल्या पैशांमुळे पुढे गुन्हेगारच जन्माला येतात हा इतिहास आहे.