सातवी माळ
श्री कालरात्री नमः
एकवेणी जपकर्णपुरा नग्ना खरास्तिथी l लंबोशठी कर्णीकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिनी l वामपादोल्सललोहलता कंटक भूषणा l वर्धनमुर्ध ध्वजा कृष्णा कालरात्री र्भ यंकारी ll
भगवती दुर्गामाते ची सातवी शक्ती म्हणजे कालरात्री होय. नवरात्रात सातव्या दिवशी तिची पूजा केली जाते. यां दिवशी साधकाचे मन सहस्रकार चक्रात स्थित असते. कालरात्री देवीस पुढील प्रमाणे नावे प्राप्त झाली आहेत. काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, रुद्रानी, चामुंडा, चंडी,
कळरात्रीचा वर्ण एकदम काळा आहें. एखादा अंधारा सारखा रंग आहें. तिला चार भुजा आहेत. गळ्यात विद्युत सारखी चमकणारी माळ आहें. तिला तीन नेत्र आहेत.तीनही नेत्र ब्रह्मांडा प्रमाणे गोल आहेत. देवीचा वरचा उजवा हात आशीर्वाद देण्या साठी वर असतो. तर उजवा खालचा हात अभयमुद्रेत डाव्या बाजूला वरील हातात परशु व डावी कडच्या खालच्या हातात खडग आहें. ही देवी दुष्टांचा नाश करते. व ग्राहबांधाचे निवारण करते.
कालरात्रीचे मंदिर बिहार मध्ये नायगाव येथे दुमरी बुजुर्ग येथे आहें तर दुसरे मंदिर वाराणसी येथे आहें. देवीच्या भक्ताला अग्निभय, जलभय,जंतू भय, शत्रू भय, रात्रीचेभय नसते.
मंत्र. यां देवी सर्व भुते्षू कालरात्री रुपेण संस्थिता नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः ll