*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*🌹आदिशक्ती अंबाबाई*
आदिशक्ती अंबाबाई
तुझं रूपगुण गाते मी ‘आई||’धृ||
शिरी सुवर्ण सुंदर मुकुटं
भाळी कुंकवाचा मळवटं
कानी शोभीवंत कुंडलं
गळ्यामध्ये रत्नहार रूळं||१||
आदिशक्ती अंबाबाई…
नाकी हिरेजडीत नथनी
प्रेम माया ओसंडे लोचनी
तुझ्या कुंदकळ्या दंतपंक्ती
अधरी केशरी प्राजक्ती —-||२||
आदिशक्ती अंबाबाई….
हाती किणकिणती कंकणे
पायी पैंजण,हो रूणझुणे
बाहुवटी नक्षीदार बाजुबंद
कटी शोभे कमरबंद. ||३||
आदिशक्ती अंबाबाई..
तुझा बुट्टीदार शालू हिरवा
रेशमी केसात माळला मरवा
आई! तुझं मुखकमल सुंदर
तुझं पाणीदार नेत्र, निळसर||४.!||
आदिशक्ती अंबाबाई…
आई,तुझं लावण्यरूप पाहूनी
माझं देहभान हरपले झणी
आदिशक्ती अंबाबाई
तुजला काय मागू मी आई!||५||
आदिशक्ती अंबाबाई….
सुष्ट शक्तीला, दृढं करssss
दुष्ट शक्तींचा ध्वंस करssss
जातीभेदाचा अवतरे,असुरsss
त्याचा समूळ संहार करssss||६||
आदिशक्ती अंबाबाई…
सर्वांभूती प्रेमभाव अंकुरू देss
जनी ऐक्य सौख्य नांदू देss
स्त्री शक्तीचा जागर होऊ देss
हा विश्वास मनी जागू दे ss||७||
आदिशक्ती अंबाबाई
तुजला हेच प्रार्थिते ‘आई’
तुजला हेच विनविते ‘आई’
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर©️®️
Advertisement
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
*Web link*