कणकवली
कणकवली उपविभागीय अधिकारी प्रांत यांना कार्यालयात चर्चा करता येत नाही का..? शासनाच्या आचारसहिते नुसार अधिकाऱ्यांना कुणाच्या घरी जाऊन चर्चा करणे, बैठक घेणे अथवा बैठकीस उपस्थित राहणे हे त्यांनी त्यांच्या अधिकारी पदाचा गैरवापर केलेला आहे.शासनाच्या आचारसंहितेची पायमल्ली करून हुजरेगिरी केलेली आहे.
कोणतीही विकासात्मक कामे, असलेल्या अडचणी, सरकारी कामे योजना अथवा तत्सम कामांबाबत चर्चा, किंवा बैठक घेण्यासाठी प्रांतधिकाऱ्यांना सुसज्ज असे कार्यालय आहे. ते असुन सुद्धा आमदार नितेश राणे यांच्या घरी जाऊन बैठक घेतली चर्चा केली.याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करीत असुन,याबाबत प्रांताधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे करणार असुन याबाबत प्रांताधिकाऱ्यांना त्यांचा खुलासा जाहीर करावा लागेल.
मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्ना संबंधित विद्यमान आमदार श्री नितेश राणे यांनी ओमंगणेश या आपल्या निवासस्थानी प्रांत, कणकवली तहसीलदार, हायवे प्राधिकरण संबंधित अधिकाऱ्री व ग्रामस्थ यांना बोलावून बैठक घेतली . मात्र या अधिकाऱ्यांनी आपले प्रशासकीय कार्यालय सोडुन कुणाच्या घरी जाऊन बैठक घेणे, बैठकीस उपस्थित राहणे. आपल्या अधिकारी पदाचा एकप्रकारे गैरवापर केलेला आहे.शासकीय अधिकारी आचारसंहिता भंग केलेली आहे असे मत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्री यांनी निवेदना द्वारे कळवले आहे.