वेंगुर्ले
जे.एस्.डब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनी च्या माध्यमातून धाकोरे,मळेवाड,आसोली,सखैलेखोल,सोन्सूरे,या महसूली गावामध्ये एकूण ८४० हेक्टर मध्ये मायनिंग प्रकल्प होऊ घातलेला आहे त्या प्रमाणे या महसूली गांवातील ग्रामपंचायतीना जनसुनावणी संदर्भात पत्र आले आहे
या मायनिंग बाधित गावामध्ये आरवली तील सोन्सूरे हे महसूल गांव येत असल्याने व येथील ग्रामस्थाचा पारंपारिक सुरंगी व्यवसाय असल्यामुळे या प्रकल्पामुळे ग्रामस्थावर बेरोजगारीची पाळी येणार आहे त्याच प्रमाणे हे संपूर्ण महसुली गांवातील जमीन,घरे,या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत अशा कारणामुळे आरवली गावचे सरपंच तातोबा कुडव यांनी पणशीकर मंगल कार्यालय येथे सर्व ग्रामस्थ यांची सभा बोलावण्यात आली होती या सभेमध्ये सरपंच तातोबा कुडव यांनी सविस्तर विषय ग्रामस्थाकडे मांडला असता सर्व ग्रामस्थाकडून हा होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला विरोध दर्शवला व याम प्रकल्पाला एक इंच सुध्दा जागा उपलब्ध करु देणार नाही असे ग्रामस्थ ठाम राहीले त्या प्रमाणे जनसुनावणी ला विरोध करुन वेळ पडली तर टोकाची भूमिका घ्यायला मागे पुढे पाहाणार नाही अशी ग्रामस्थानी भूमिका घेतली आहे.