कणकवली
कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.रुपाली गणपत नागप यांची झालेली निवड म्हणजे एका शेतकरी महिलेच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला मिळालेली नेतृत्वाची संधी आहे. वाघेरी गावात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सौ.रुपाली गणपत नागप यांचा शिवसेनेच्यावतीने उपसरपंच अनुजा राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन श्रीकांत राणे, व्हाईस चेअरमन तुकाराम गुरव, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, शाखाप्रमुख सिताराम गुरव, दत्तात्रय राणे व नागप कुटुंबीय उपस्थित होते.
महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत.. शहरातील महिला विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत असल्या तरी ग्रामीण भागातील महिलाही आता मागे नाहीत.. आपलं कुटुंब सांभाळून, शेती सांभाळून सामाजिक कार्यातही आपला वेगळा ठसा उमटवनाऱ्या महिला आज गावागावांत दिसतात.. ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे महिलांना आरक्षणाने नेतृत्वाची संधी मिळते.. पण गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर अध्यक्षपदी निवड होणे म्हणजे महिलांना मिळालेली एक सुवर्णसंधी आहे असे मानले जात आहे.