तब्बल २८ वर्षे बॉलिवूड जगताची सफर ते मराठी साहित्य मंडळाचे विदर्भ विभाग अध्यक्ष…एक जादुई प्रवास…
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे… याची जाणीव करुन देणारं मूर्तीमंत उदाहरणं म्हणजे….*सिध्दार्थ कुलकर्णी*… यशस्वी असुनही प्रसिध्दी झोतात नसलेल्या या थोर *महान व्यक्तिमत्वाची साक्ष* त्यांच्या कामावर एक नजर टाकल्यावर येते ….
*सुरवात केवळ ध्वनिमुद्रक म्हणुन केली आणि मग…. संकलक, लेखक, असिस्टंट डायरेक्टर , डायरेक्टर, मॉडेल/आर्टिस्ट समन्वयक , पी. आर. ओ. , संगीतकार, प्रसिध्दी प्रमुख, इव्हेंट मॅनेजर , म्हणुन २८ वर्षाचा काळ बॉलिवुडशी संबंधित बहुमूल्य कामगिरी… ते आता *मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष* इतका मोठा पल्ला गाठला आहे.
*दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर पासून अगदी आज कालच्या टायगर श्रॉफ… आलिया भट पर्यंत* जवळपास चार ते पाच पिढ्यांबरोबर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेली व्यक्ती म्हणजे ” सिध्दार्थ”…..
नाटक असो की सिनेमा, सिरीयल असो की डान्स शो, रिॲलिटी शो.. रेडिओ असो की FM channel….
भाषा कुठलीही असो जवळपास सर्वच भाषांत प्रसिध्दी करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ती अविरतपणे त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली…..
चार ते पाच पिढ्यांतील अगणित कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, कॅसेट कंपनी, टीव्ही चॅनल, रेडिओ चॅनल, स्टेज, संबंधित सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी *त्यांनी करत असलेल्या कामाचं कुठलही तांत्रिक शिक्षण न घेता केवळ इच्छाशक्ती आणि अपार मेहनतीने बजावली आहे*.
*९०च्या दशकातील जवळपास सर्वच सुपरहिट हिंदी चित्रपटांची प्रसिध्दी करुन Musical Hit फिल्म्स च दशक स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे*….. ज्यात मुख्यत्वे करुन… लाल दुपट्टा मलमल , का जीना तेरी गली में , मैने प्यार किया, तेजाब , ईश्वर, घायल, दिल , बेटा , राम लखन, हम आप के है कौन , खलनायक , प्रेम प्रतिज्ञा , राजा , क्रांतिवीर , तिरंगा,
गझनी, पार्टनर, असे एका पेक्षा एक बरेचं हिट, सुपरहिट चित्रपट आहेत….
एकंदर कारकीर्दीत त्यांना १८ एक अवॉर्ड मिळाली आहेत…..
त्यानंतरही समाधान न मानता दुबई मधे इलेक्ट्रॉनिक विभागात…. व्हिडिओ वॉल , CC TV camera , Projector S installation , Auditorium Work या क्षेत्रातही नावं मिळवले आहे …
आणि अशा विविध क्षेत्रात मोलाची उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या व्यक्तीने एप्रिल मधे पार पडलेल्या उदगीर येथील साहित्य संमेलनात , तसेच ठाणे… पुणे… पिंपरी चिंचवड येथील संमेलनात सक्रिय सहभागी होवून साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याचा विडा उचलून मराठी साहित्य संपुर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम हाती घेतलं आहे…..
अशा या चौफेर व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची नुकतीच… आखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळात *विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष* म्हणून झालेली निवड सार्थ आहे याची ग्वाही मिळते …. श्री.सिध्दार्थ कुलकर्णी यांना या पुढील कार्यात खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐