वैभववाडी तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न.
वैभववाडी प्रतिनिधी :
परतीच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा. संबंधित यंत्रणेने पंचनामे करण्यास विलंब लावू नये. या कामामध्ये चालढकलपणा अजिबात खपवून घेणार नाही. असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
वैभववाडी तहसील कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीबाबत आढावा घेतला. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, कृषी अधिकारी साखरकर, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे व पदाधिकारी उपस्थित होते.
35 ते 40 टक्के भातशेतीचे परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. बरीच शेती जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कृषी अधिकारी साखरकर यांनी सांगितले. संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.