नवीन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये Ministry of Housing and Urban यांचेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमा अंतर्गत 3 दिवसांचा स्वच्छ शहर संवाद, कचरामुक्त शहर, भारत विरुद्ध कचरा असा कार्यक्रम आयोजित आहे. मालवण नगरपरिषदेच्या वतीने मा.मुख्याधिकारी श्री.संतोष जिरागे यांना मा.श्री.कौशल किशोर, केंद्रीय मंत्री, Housing and Urban Affairs Department, मा.श्रीम.रूपा मिश्रा, सह सचिव, Ministry of Housing and Urban Affairs and राष्ट्रीय मिशन संचालक यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग देशातील एकूण 4300 शहरांमध्ये राबविण्यात आली होती, या स्पर्धेची सुरुवात Rally of Youth for Garbage Free Beaches, Hills and Tourist Places या कार्यक्रमाच्या शुभरंभाने दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी झाली होती. या स्पर्धेचा मूळ उद्देश्य कचरा मुक्त शहर ही संकल्पना व्यापाकतेने राबविणे, देशातील पर्यटन शहरांना अधिक सुंदर व स्वच्छ बनविणे आणि एकंदरीत शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे हा होता.
या स्पर्धेअंतर्गत मालवण नगर परिषदेकडून Rally of Youth for Garbage Free Beaches and Tourist Place चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन एकाच दिवसात शहरातील एकूण 8.5 किलोमीटरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला होता.या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहराचा संघ मालवण वॉरियर्स या नावाने नोंद केला होता. या संघामध्ये शहरातील शाळा, महाविद्यालय, NCC, NSS, विविध सेवाभावी संस्था, पत्रकार, नागरिक, शहरातील सरकारी कार्यालये, ई. सहभागी झाले होते.
नगर परिषदेने एक पर्यटन शहर असल्याकारणाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेली जनजागृती, या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्था, नागरिक यांचा सहभाग, या कार्यक्रमामुळे शहर स्वच्छतेवर होणारा सकारात्मक परिणाम, शहरातील नागरिकांची स्वच्छतेविषयीची जागरूकता, या कार्यक्रमास पत्रकारांकडून व बातमीपत्रे, मीडिया कडून मिळालेली प्रसिद्धी व महत्वाचे म्हणजे नगर परिषदेकडून केंद्र शासनाला वेळोवेळी करण्यात आलेले सादरीकरण या निकषानुसर या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याय आले होते.
मालवण हे ऐतिहासिक व पर्यटन दृष्टया महत्वाचे व प्रसिद्ध शहर आहे. मालवण नागरपरिषदेचा केंद्रशासना कडून झालेला हा सन्मान मालवण, तारकर्ली, देवबाग यासह संपूर्ण मालवण तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा ठरेल.
“मालवण शहराचा हा सन्मान मालवण वासियांच्या स्वछता विषयक सजगतेमुळे शक्य”…..*- मुख्याधिकारी संतोष जिरगे*
मा.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मा.केंद्रीय मंत्री नारायण राणे, मा.खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालक मंत्री मा.रवींद्र चव्हाण, मा.आमदार वैभव नाईक, जिल्ह्याचे माजी पालक मंत्री मा.दीपक केसरकर आणि मा.उदय सामंत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक श्री.समीर उन्हाळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानची संपूर्ण टीम, कोंकण विभाग आयुक्त, उपयुक्त , माजी नगरपरिषद लोकप्रतिनिधी, व्यापारी, मासेमार बांधव, सेवाभावी संस्था, यांच्याकडील वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, शहर वासियांचा सहभाग तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या मेहनातीमुळे मालवण शहर या बक्षिसास पात्र ठरले असे मत नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी व्यक्त केले.
“केंद्र शासनाकडून झालेल्या या सन्मानामूळे जबाबदारी अजून वाढलेली आहे व या वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सुद्धा मालवण वासियांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील….”…..*- मुख्याधिकारी संतोष जिरगे*
या प्रयत्नात कचरा मुक्त शहर करण्यासाठी , कचरा विरुद्ध लढण्यासाठी सर्व मालवण वासियांनी तयार राहावे व मालवण शहराला एक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर नावारूपास येण्यास सज्ज राहावे असे आवाहन केले.