नागरिकांना रॅलीत उपस्थित राहण्याचे आवाहन – महेंद्र सांगेलकर
सावंतवाडी
केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी केलेले नवीन कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे असल्याने या विरोधात कॉंग्रेसने व्हर्च्युअल शेतकरी बचाव रेलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात हे कायदे अडवण्यासाठी या रॅलीचे आयोजन आज संध्याकाळी ४ वाजता करण्यात आले असून, या रॅलीला कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले आहे.