फोंडाघाट येथे आज परतीच्या पावसानं अक्षरशः कहर केला. तब्बल सहा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या.विजांच्या गडगटासह पाऊस कोसळल्याने नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमांवर विरजण पडले. वीज प्रवाह ६ तास खंडित झाला.
त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत त्या संंबंधी एम.एस.ई.बी.मध्ये रात्री जावुन जाब विचारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिली आहे. व्यापारी अध्यक्षानी यात पुढाकार घेवुन फोंडाघाट मधील M.S.E.B. च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.