You are currently viewing कणकवलीत उलगडला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट…

कणकवलीत उलगडला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट…

चित्र प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण जीवनपट कणकवलीत चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या चित्रा प्रदर्शनाचे उद्घाटन आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शन हा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु या प्रदर्शनातील फोटो पेक्षा कित्येक पटीने नरेंद्र मोदी यांचे कार्य मोठे असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी काढले. तसेच या प्रदर्शनातील सर्व फोटोंचे एक पुस्तक बनवून ते जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला असताना या सेवा पंधरावडयाच्या निमित्ताने कणकवलीत भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली पेट्रोल पंप समोर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा, गांगण, आण्णा कोदे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, सरपंच संतोष राणें, बबलू सावंत, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संदीप मेस्त्री, महेश सावंत, नितीन पाडावे, सरपंच मंगेश तळगावकर, प्रशांत राणें, पंढरी वायगणकर, सुरेश सावंत, परशुराम झगडे, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच सचिन पारधीये, नगरसेविका मेघा सावंत, सायली सावंत, शिवप्रसाद देसाई, सदा चव्हाण, अभय राणें, नगरसेवक रवींद्र गायकवाड, बंडू गांगण, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, प्रकाश सावंत, सरपंच सुहास राणे, नितीन पाडावे, भाई आंबेलकर, समर्थ राणें, नामदेव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा