You are currently viewing रेणुका देवी माहूर (नांदेड )

रेणुका देवी माहूर (नांदेड )

महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठ पैकी रेणुका माता. हे एक शक्ती पीठ आहें. परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते.रेणुका मातेचे मंदिर माहूरगडावर आहें. याच गडावर श्री गुरु दत्तात्रेयांचा जन्म झाला आहें. येथे दत्तात्रेयांचे, अनुसूया, परशुरामची मंदिरे आहेत. माहूरगड हा चारही बाजूनी घनदाट जंगलांनी वेढला आहें. हे देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजांनी बांधले आहें.
माहूर हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहें. सम्राट प्रसनजीत ची राजकन्या म्हणजे देवी रेणुका माता होय. देवीचे जन्मस्थान माहूर आहें.रेणुका मातेची आणि परशुरामची एक आख्यायिका आहें. आजचे छत्तीसगड हे राज्य म्हणजे पूर्वीचा कुब्ज देश. यां देशाचा राजा सम्राट प्रसेनजीत होय.तिचे लग्न शंकराचे अवतार असलेले जमदाग्नी ऋषीं यांच्या बरोबर झाले. त्यांचाच पुत्र परशुराम होय.
जमदगनी ऋषीं च्या आश्रमात अनेक शिष्य शिकण्या साठी होते त्या आश्रमात कामधेनू गाय होती. ही गाय सर्वांच्या इच्छा पुऱ्या करत असे. एकदा राजा सहस्त्रार्जून आश्रमात आला त्याने कामधेनू गाय पहिली आणि त्याच्या मनात तिच्या विषयी लोभ उत्पन्न झाला.त्याने जमद्गणी ऋषीं कडे कामधेनू गाय मागितली. त्यांनी ती देण्यास त्यांनी नकार दिला. त्यावेळी परशुराम आश्रमात नव्हते, ही संधी साधून सहस्ररजूनाने आश्रमावर हल्ला केला आणि जमदगनी ऋषींना ठरवा मारले. आश्रम सर्व उध्वस्त केला. नंतर परशुराम तिथे पोहोचले. सर्व प्रकार त्यांना समजल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. व त्यांनी सर्व क्षत्रियांचा नाश करिन अशी प्रतिज्ञा केली. नंतर त्यांनी एक कावड घेतली एका भागात जमदगनी ऋषींचे पार्थिव ठेवले. दुसऱ्या भागात मा रेणुका देविना बसवले. आणि कवाड घेऊन तें कोरी भूमी शोधात निघाले कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी साठी कोरी जमीन हवी होती. खूप रानोमाळ फिरल्या नंतर तें माहूरगडावर फिरले. तेथे त्यांची भेट दत्तात्रेयां न बरोबर झाली.. दत्तगुरुनी त्यांना माहूर गडावर कोरी भूमी अंत्यविधी करिता दिली. विधी चे पौरोहित्य दत्तगुरुनी केले. नंतर रेणुका माता सती गेल्या.त्यानंतर परशुरामाना रेणुका मातेची खूप आठवण येत होती. ते दुःखी होऊन खूप शोककरू लागले. तेवढ्यात आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. पण तू आता मागे वळून पाहू नको. थोड्या वेळाने परशुरामांना राहवले नाही त्यांनी मागे वळून पाहिले. तो पर्यंत फक्त डोक्याचा भाग जमिनीवर आला होता.बाकी भाग जमिनीखाली राहिला. हया रेणुका मातेच्या शिरास (डोक्यास ) तांदळा म्हणतात.
रेणुका मातेच्या मंदिराचा उल्लेख महाभारतात, हरिवंश,आणि देवी भागवतात आहें. रेणुका मातेचे एक मंदिर नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे आहें. हया मंदिराचा जीर्णोद्धार 1735 ते 1795 यां काळात अहिल्याबाई होळकर यांनी केला. दक्षिणे कडील यल्लाम्मा देवी ही रेणुका देवीचेच स्वरूप आहें.
कल्पना तेंडुलकर
ओरोस

प्रतिक्रिया व्यक्त करा