मालवण :
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, कुडाळ येथे शिकत असलेल्या चतुर्थ वर्षांतील विद्यार्थिनींनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत प्राथमिक शाळा सारंगवाडी, नांदोस मध्ये विविध उपक्रम राबवून शाळेतील मुलांना एक वेगळाच अनुभव दिला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थांना सभोवतालचा विविध औषधी वनस्पतींची माहीती करुन दिली व त्यांचा विविध रोगांवर उपाय कशा प्रकारे करावा तशेच त्यांच्या सोबत झुबां नृत्य याचे शिक्षण दिले. या उपक्रमासाठी केंद्र प्रमुख श्री.सावंत सर सुध्दा उपस्थित होते.