बेधुंद मन
कोसळल्या जल धारा भूवरी,
अंगणी मोर नाचला होता.
मनमोहक तो फुलला पिसारा,
मखमली पिस सांडला होता.
चिंब ओली तिची काया,
भिजूनी पदर लाजला होता.
सरसर सरींनी पावसाच्या,
अंगाचा दाह शमला होता.
उजळून गेली कांती तिची,
ओठ थरथर कापला होता.
रोम रोम रोमांचित झाले,
काटा अंगाशी झोंबला होता.
मादक तिच्या सौंदर्यावर,
राजा वरूण भाळला होता.
एकांतात भेटता सखेशी,
प्रेमाचा खेळ रंगला होता.
ओघळणारा थेंब पावसाचा,
नाकावरी मोती भासला होता.
सुटता वारा वाऱ्यासवे उडुनी,
मोती हवेत विरला होता.
(दीपी)
दीपक पटेकर
#८४४६७४३१९६