You are currently viewing डॉ. गोविंद काजरेकर यांची बांदा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती

डॉ. गोविंद काजरेकर यांची बांदा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती

 

बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदाच्या प्राचार्यपदी डॉ.गोविंद काजरेकर यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. काजरेकर हे याच महाविद्यालयात गेली २७ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी विषयात पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ही आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर लेखक संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डॉ. काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी व समीक्षक असून त्यांच्या साहित्य निर्मितीला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारासह एकूण चार राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत. डॉ.काजरेकर मागील तीन वर्षे गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. आता त्यांची विद्यापीठ व शासन नियुक्त समितीमार्फत निवड होऊन त्यांना प्राचार्यपदी नेमण्यात आले. त्याविषयी त्यांना विद्यापीठाच्या मान्यतेनुसार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.डी.बी. वारंग यांनी अधिकृत पत्र दिले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ बांदा या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद कामात ,सचिव श्री.एस.आर.सावंत, खजिनदार श्री.टी.एन.शेटकर, सहसचिव श्री.डी.एस. पणशीकर, सदस्य श्री. सुभाष मोर्ये, श्री.मंदार कल्याणकर, श्री.प्रेमानंद नाडकर्णी, श्री.शीतल राऊळ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा