पणदूर :
राष्ट्रीय पोषण पंधरवडा अंतर्गत आज पणदूर शाळा नं. २ येथे पोषण आहार जत्रा उपक्रम साजरा करण्यात आला.
या उपक्रमात पाककला प्रदर्शनामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी अंगणवाडी व शाळेतील मुलांच्या माता व पालकांनी अनेक प्रकारचे पौष्टीक पदार्थ बनवून उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. संजना नाईक, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ सदस्य, अंगणवाडी पालक उपस्थित होते.