एकदिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग संपन्न
तळेरे:- प्रतिनिधी
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी मधील विद्यार्थ्यांना ‘स्वसंरक्षण’ अंतर्गत एकदिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला.
कासार्डे ता.कणकवली येथील आयडियल ज्युदो कराटे जिल्हा असोसिएशन सिंधुदुर्ग या संघटनेच्यावतीने प्रशिक्षक सोनू जाधव यांनी या ‘एकदिवसीय’ कराटे प्रशिक्षण वर्गात सहभागी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मधील ‘आजीवन शिक्षण आणि विस्तार कक्षाच्यावतीने हा अभिनव उपक्रम यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील काही निवडक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
बी फार्मसी मधील चौथ्या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनी कु.पुनम गवळी,कु.जागृती सुर्वे , कु.प्रणोती भोईटे,कु.पल्लवी गुरखे, कु.प्रांजली शांडिल्ये, अनिकेत मोरे, गौरव चव्हाण व कु.प्रतीक्षा मिस्त्री आदींनी हा उपक्रम संपन्न होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
‘विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण’ उपक्रम अतिशय उत्तम रित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्य डॉ.विजय जगताप, प्रा. सौ रश्मी महाबळ, प्रा.शितल सावंत विभाग प्रमुख डॉ. रोहन बारसे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कासार्डे येथील कराटे प्रशिक्षक सोनू जाधव यांना उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील कराटे प्रशिक्षणासाठी सहभागी विद्यार्थी,प्राचार्य जगताप,ज्यूदो कराटे प्रशिक्षक सोनू जाधव व बी फार्मसी मधील विद्यार्थी