You are currently viewing कणकवलीत सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीच्या संपर्कात आल्याने सिलिंडरने घेतला पेट

कणकवलीत सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीच्या संपर्कात आल्याने सिलिंडरने घेतला पेट

सुदैवाने जीवितहानी नाही

कणकवली

जळकेवाडी येथील घरगुती सिलेंडर चा नॉब उघडत असताना सिलेंडरने तेथील आगीच्या संपर्कात आल्याने अचानक पेट घेतला. कणकवली जळकेवाडी येथील बबन चव्हाण यांच्या घरात गुरुवारी सकाळी ९:०० वा. सुमारास ही घटना घडली. प्रसंगसावधान राखत बबन चव्हाण यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी पेटता सिलेंडर घराबाहेर ढकलला. यात येथील घराच्या वाशांना आग लागली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी नाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह स्थानिकांनी प्रसंग सावधान राखत सिलेंडरची आग विझवली. यात घराबाहेर सिलेंडर ढकलल्याने पेटत्या सिलेंडर मुळे तीन वाशांनी पेट घेतला. या घरापर्यंत जाण्यासाठी अरूंद रस्ता असल्यामुळे घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब पोहोचू शकला नाही. परंतु नंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह सर्वांनी सतर्कता बाळगून छोट्या बंबाला पाचरण करण्यात आले. तत्पूर्वीच नागरिकांनी आग आटोक्यात आणली.सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत कर्मचारी रोहन डीचोलकर, विनोद जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा