*अनिसा सिकंदर यांच्या “बालतरंग” काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार*
संकल्प फौंडेशन तिरपण, महागाव
“गडहिंग्लज, जि.कोल्हापूर या संस्थेचा सन्मानाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार लेखिका, कवयित्री अनिसा सिकंदर यांच्या “बालतरंग” काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. विविध साहित्य प्रकार समृध्द करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच साहित्यिकांच्या लेखणीला बळ देण्याच्या उद्देशाने व मराठी साहित्य समृध्द करणार्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने संकल्प परिवाराने या वर्षीपासून राज्यस्तरीय पुरस्कार सुरु केले आहेत.
या पुरस्कारासाठी एकूण १५३ प्रस्ताव उपलब्ध झाले होते. या वर्षीचा अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार दौंड येथील अनिसा सिकंदर शेख यांच्या बालकविता संग्रह “बालतरंग” ला जाहिर झाला आहे. “बालतरंग” या बाल संग्रहाला प्रा.विसूभाऊ बापट (कुटूंब रंगलय काव्यात) यांची प्रस्तावना लाभली आहे. लवकरच पुरस्काराचे वितरण महागाव ता.गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे एका भव्य समारंभात होणार आहे. अशी माहिती एका प्रसिध्द पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष युवराज आनंदराव सरनोबत, उपाध्यक्षा सौ.आदिती युवराज सरनोबत तसेच सचिव सौ.वैशाली जयंत मिसाळ यांनी दिली आहे.
अनिसा सिकंदर शेख यांनी मराठी हिंदी ऊर्दु, कविता, ललित ,अभंग, भावगीत, लावणी, कथा, बालकथा, बालगीत, गझल अशा विविध वाड;मय प्रकारात आपले लेखण केले आहे. त्यांचा “संवाद हृदयाशी” मराठी कविता संग्रह, “सांगाती” चारोळी काव्य संग्रह, प्रकाशित आहे. सावित्रीबाईच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांच्यावर महाराष्टातील प्रथमच प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे संपादन अनिसा शेख यांनी केले आहे.