You are currently viewing प्रेरणा प्रभागसंघ, कोलगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रेरणा प्रभागसंघ, कोलगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सावंतवाडी

प्रेरणा प्रभागसंघ, कोलगाव ची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज तोरस्कर प्रीमयसेस, ग्रामपंचायत कोलगाव जवळ घेण्यात आली.

या सभेचे उदघाटन भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक श्री प्रदीप ठाकरे,प्रभागसंघ अध्यक्ष सौ निकिता परब,सचिव सौ दीपिका राऊळ, कोषाध्यक्ष लीना आलमेडा ,कारीवडे सरपंच सौ अपर्णा तळवणेकर,आंबेगाव सरपंच सौ वर्षा वरक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
प्रभागसंघ अध्यक्ष, डॉ देवधर व श्री महेश सारंग यांच्या हस्ते वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.

यावेळी 3 उत्कृष्ट ग्रामसंघ व 3 उत्कृष्ट समूह यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट ग्रामसंघ
1)चैतन्य ग्रामसंघ,भोम-कोलगाव
2)प्रगती ग्रामसंघ, भैरववाडी
3)सातेरी ग्रामसंघ, कोलगाव
उत्कृष्ट समूह
1)स्वामी समर्थ महिला समूह,भोम
2)महालक्ष्मी महिला समूह, भोम
3)महालक्ष्मी महिला समूह, कारीवडे-पेडवेवाडी

यावेळी डॉ देवधर यांनी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यसाठी बायोगॅस, कुक्कुटपालन ,शेती असे व्यवसाय उभे करावेतअसे सांगितले.
श्री महेश सारंग यांनी जिल्हा बँकेच्या योजनांची माहिती दिली. तालुका अभियान व्यवस्थापक श्री ठाकरे सर यांनी शाश्वत उपजीविका उभारणी साठी उमेद मार्फत चालू असणाऱ्या योजनांची माहिती दिली. कोषाध्यक्ष लीना आलमेडा यांनी 21-22चा आर्थिक ताळेबंद व 22-23चे अंदाजपत्रक मांडले.

या बैठकीला सर्व ग्रामसंघतील महिला उपस्थित होत्या. कारीवडे,आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव चे सरपंच, उपसरपंच,ग्रा पं सदस्य, माजी पं. स.सदस्य प्राजक्ता केळुस्कर, तोरस्कर सर ,तालुका व्यवस्थापक गवंडे सर, स्वाती रेडकर मॅडम, पाटकर मॅडम तसेच तालुक्यातील सर्व प्रभाग समन्वयक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा