You are currently viewing मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ.श्री दुरभाटकर यांची भेट.

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ.श्री दुरभाटकर यांची भेट.

वैद्यकीय अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देत दुर्भाटकरांना दिल्या मनसे शुभेच्छा…

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालय सद्यस्थितीत समस्यांच्या गर्तेत आहे. त्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करा, तसेच रिक्त असलेली पदे भरा, अशी मागणी मनसेच्यावतीने नुकताच पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान अनेक महिने बंद असलेले शवागृह सुद्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे यावेळी सांगण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री. दुर्भाटकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध समस्या उद्भवत आहेत. वैद्यकीय अधिकारी व तज्ञांची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तर बाहेर उपचार घेणे शक्य नसलेल्या रुग्णांना प्राण सुद्धा गमवावे लागत आहेत. याकडे रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. दुर्भाटकर यांच्याकडे केली. तर शावगृह सुद्धा गेले अनेक महिने बंद अवस्थेत असल्यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे. या सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच सिटीस्कॅन मशीन उपलब्ध व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी उपस्थित पदाधिकारी यांनी केली. व श्री दुरभाटकर यांनी योग्य तो पाठपुरावा करून कमतरता असलेल्या सुविधा उपलब्ध करणार असल्याचे मनसे पदाधिकारी याना आश्वासन दिले.यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर, निलेश पेंढुरकर, उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, सचिव कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, संदेश शेटये आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा