You are currently viewing जातं

जातं

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखीत अप्रतीम लेख*

*जातं*

मी जातं,

जातीपातीतील नव्हे ! खूपच अनादी कालीन ! माझ्या शिवाय ह्या मानव जातीची भूक भागत नाही ! तसा माझा ह्या पृथ्वीवर जन्म केव्हा झाला ते सांगता येत नाही . गरज ही शोधाची जननीच ! त्यामुळेच माझा शोध कोणत्या अवलीयाने लावला ते ही अज्ञात !
कदाचित रामायण , महाभारत असेल किंवा त्यापुढेही माझा जन्म झाला असेल , नक्की सांगता येत नाही एवढं खर ! मानवी भूक निर्माण झाली व गहू बाजरी ज्वारी निर्माण झाली
तेंव्हा पासूनच मी आहे ! पण माझं अस्तित्व अजुनी टिकून आहे , व पुढेही टिकून राहील !
मी मुळातच दणकट व खंबीर ! कारण मी दगडातून निर्माण झाले . माझं व स्त्रीच सख्य हे कायमच , स्त्री माझी बाल मैत्रीण ! तिच्या वाटेला आलेलं सुख दुःख मी स्वतः पाहिलंय ! तिच्या वेदना मी जाणल्या !
माझी घरघर व तिच्या प्रपंच्याची घरघर ही भल्या पहाटेच होत असे ! तीन मला
ब्राम्ह्य मुहूर्तावर जाग करण्याची सवय लावली ! तिच्या खड्या आवाजातील
ओव्या व माझी घरघर एकदमच एकावेळी चालू होतं असत . व आमच्या आवाजाने मग इतर लोक उठत असत .
माझी सुख दुःखाची दोन पाती (पाळ ) मी स्त्रीच्या गळ्यात बांधली ! हे कमी पडू नये म्हणून माझ्या वरच्या पाळीच्या कडेला गोलसर खळीत वेदनेचा दांडा बसवला गेला ! (कदाचित तो त्रिगुणात्मक असावा ) जेणेकरून तो दांडा हातात धरून मला गोलगोल फिरवता येईल अशी सोय पण केली ! खळी ही जणू माझ्या गालावरचीच खळी ! कायमची ! माझा दांडा व तिच्या वेदना ह्या केव्हा एकरूप झाल्या ते कळलेच नाही ! पाळ बाजूला केल तरी , तो वेदनेचा दांडा तसाच ठेवला जातो .
माझ्या खालच्या पाळ्याला मात्र मधोमध एक सुख दुःखाना एकत्र ठेवणारा , प्रेमाचा मजबूत खिळा आहे ! जेणेकरून दोन्ही सुख दुःखाची पाळी एकत्र नांदतील !
मी म्हटलं तर वर्तुळाकार ! म्हटलं तर शून्य ! 360 अंशातून कायम फिरते ! व माझ्या भोवती तो वेदनेचा दांडा पण फिरतोच ! माझ्यात व सृष्टीत काय फरक आहे ! ती पण गोल फिरत असतेच की सूर्यभोवती ! काहीवेळा वापर नसल्यास शून्या सारखी हरवते ! शून्यात टक लावून बसते !
माझ्या वरच्या पाळीत माझं ऊर्ध्वमुखी तोंड ! जे मुखात पडेल ते गोड मानून घेते ! कधी गहू ,कधी ज्वारी, कधी कडवट बाजरी , कधी शुभ्र तांदुळ ! येणाऱ्या घासाला पवित्र मानून , त्याचे चर्वण करायचे व त्याचे कठीण अस्तित्व घालून त्याला सुता सारखे मऊ करायचे ! व बाहेर त्याला धुतल्या तांदळासारखा शुद्ध करून पाठवायचे !
जो पर्यंत संसार आहे , प्रपंच आहे , तोपर्यंत माझं हे काम असच अव्याहत पणे चालू असणार ! संसार म्हटलं की भूक आलीच ! ह्या संसारात मोक्ष मिळे पर्यंत हेच माझं अखंड व्रत ! व्वा काय जन्म दिलास देवा ! माझ्या ह्या भाळी दोन सुख दुःखाच्या पाळी , ऊर्ध्वमुख वर वेदनेचा दांडा ! तो ही शून्यात फिरणारा !
कित्येक दाणे मुखात येतात , कित्येक सुपात आहेत , कित्येक शुभ्र होऊन
बाहेर पडले ! मी मात्र तशीच फिरत आहे . वरच्या पाळीत मात्र तू विविध नक्षी कोरलीस
पण खालच्या पाळीच काय ? तिला मात्र छन्निचे घाव सोसावे लागतात !
माझं कालपरत्वे रूप बदललं ! यांत्रिकी झालं ! कोणी मिक्सर केलं म्हणून काय झालं ? माझ्या पाळ्या बदलाव्या लागल्या तरी , मी अजुनी वर्तुळातच फिरते ! ती कायमची येणार दळण दळत !!

प्रो डॉ जी आर प्रविण जोशी

अंकली बेळगाव

कॉपी राईट 27 सप्टेंबर 2022

Advertisement

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा