*पदयात्रेत आमदार वैभव नाईक झाले सहभागी*
कणकवली :
नफरत छोडो, संविधान बचाओ अभियांतर्गत सिंधुदुर्गात संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर ही पदयात्रा शहरातून गोपुरीच्या दिशेने रवाना झाली. यात्रेदरम्यान संविधानप्रेमींनी बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व गोपुरी आश्रमातील कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमात संविधानप्रेमींनी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’, ‘संविधान एक परिभाषा है, संविधान एक अशा है’ यासह अन्य घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या संविधान बचाव पदयात्रेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. तसेच लेखक नितीन साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा बँकेचे संचालक, नगरसेवक सुशांत नाईक, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे, प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, अभिनेता नीलेश पवार, सुंगधा साटम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, महेश तेली, माजी जि.प. सदस्य नागेश मोरये, विनायक मेस्त्री, अॅड. मनोज रावराणे, विजय सावंत, रामू विखाळे, रुपेश आमडोसकर, निसार शेख, सचिन आचरेकर, प्रशांत वनसकर,महानंदा चव्हाण, संजय राणे, विनायक सापळे, सचिन चव्हाण, मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लेखक नितीन साळुंके म्हणाले, देशात प्रत्येक नागरिक सध्या अस्वस्थ आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून दैनदिन गरजाभागवून पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र, महागाईच्या मुद्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच देशात दोन व्यक्तींच्या कंपनीचे सरकार असून या सरकारच्याविरोधात आपल्या आक्रोश व्यक्त करण्यासाठी संविधानिक आयुधांचा वापर करून जनतेने आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन लेखक नितीन सांळुके यांनी केले.त्याचबरोबर अॅड. मनोज रावराणे,ईशाद शेख,नीलेश पवार यांनीही आपले विचार मांडत संविधानाचे महत्त्व विशद केले.तसेच संविधान बचाओ मोहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले. यावेळी नामानंद मोडक यांनी भगतसिंग यांनी लिहिलेले पत्र यावेळी वाचून दाखविले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.