रक्तदान शिबिरासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली
भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरावड्या निमित्त कणकवली तालुका भाजपचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या येथील दुर्गा मातेच्या मंडपात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्यात कणकवली, देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा मतदार संघ समन्वयक मनोज रावराणे,तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री संतोष कानडे, युवक जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप मिस्त्री, पप्पू पुजारे,माजी सभापती दिलीप तळेकर प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत सरपंच पंढरी वयगांकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवक शहर अध्यक्ष गणेश तळेगावकर,सागर राणे,सर्वेश दळवी,नितीन पाडावे, प्रज्वल वर्दंम, समीर प्रभू गावकर यांच्या सह असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.