नांदेड येथील सचखंड एक्सप्रेस चे रेल्वे इंजिन गेले पुढे आणि उर्वरित गाडी मागेच थांबली..
नांदेड येथील नेहमी प्रमाणे निघालेली सचखंड एक्सप्रेस बुधवारी हजूर साहिब स्थानकातून सकाळी निघाली. खडकपु-याजवळ जातात सचखंडचे इंजिन चार डब्बे घेऊन पुर्णेच्या दिशेने धावत सुटले. उर्वरित गाडी मागेच थांबली. यामुळे गोंधळून गेलेल्या गाडीतील प्रवाशांना धक्काच बसला. सुदैवाने वेग कमी होता म्हणून मोठा अपघातही टळला. हा प्रकार दोन डब्ब्यांना जोडणारी कपलींग निघाल्याने घडला, असे रेल्वेच्या अधिका-यांकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जवळपास सहा महिन्यापासून रेल्व सेवा बंद होती. नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून सचखंड एक्सप्रेस ही अमृतसर रेल्वे मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. दिल्ली, अमृतसर, पंजाब राज्यातून मोठे शिख भाविक सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र बुधवार दि. १४ रोजी सकाळी अमृतसरकडे निघालेल्या सचखंड एक्सप्रेसला अपघात झाला. सुदेैवान यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. सकाळी साडेनऊ वाजता सचखंड एक्सप्रेस नांदेडहून अमृतसरकडे जाण्यासाठी हजूर साहेब रेल्वेस्थानकातून बाहेर पडलीक़ाही अंतरावर असलेल्या खडकपूराजवळ रेल्वे यताच सचखंडचे इंजिन चार डब्बे घेऊन पुर्णेच्या दिशेने धावत सुटले.
मात्र उर्वरित गाडी मागेच राहिली. तेव्हा प्रवाशांना धक्काच बसलाग़ाडी जवळपास शंभर मीटर पुढे गेल्यानंतर गार्डच्या सावधानेतेने चालकास हा प्रकार कळाला. त्यानंतर गाडी थंबविण्यात आली. यामुळे सुदैवाने गाडीचा वेग कमी होता म्हणून मोठा अपघात टळला. ही माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस पोहचले. दोन डब्ब्यांना जोडणारे कपलींग निघाल्याने हा प्रकार घडल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगीतले. क़पलींगमध्ये दुरुस्ती करून तब्बल एक तासांनी सचखंड पुढे सोडण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगीतले.