You are currently viewing धनगर समाजाच्या “एस. टी” प्रमाणपत्राची त्वरित अंमल बजावणी करा…

धनगर समाजाच्या “एस. टी” प्रमाणपत्राची त्वरित अंमल बजावणी करा…

राष्ट्रपतींसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर; विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह देण्याची मागणी…

ओरोस

धनगर समाजाच्या घटनात्मक हक्काची देय असलेले एस टी प्रमाणपत्राची त्वरित अंमल बजावणी करावी. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यासाठी निवेदन आज जिल्हा प्रशासना जवळ ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मधुशंकर टिळे यांनी दिले.
या निवेदनात महाराष्ट्र शासनाने ७ ऑगस्ट २०१९ क्या निर्णयानुसार ज्या सुविधा आदिवासी धनगर जमातीसाठी मंजूर केल्या आहेत, त्या सर्व सुविधा सुरू कराव्यात. मेंढपाळाना मेंढ्या चारण्यासाठी वन क्षेत्र मुक्त करणारा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पारित करावा. शासन निर्णयानुसार २० मेंढ्यांसाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील प्रत्येक महिन्यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे २४ हजार रुपये चराई अनुदान त्वरित वाटप करावे. राज्यातील धनगर समाजातील दहावी पास झालेल्या सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रत्येकी पाच लाख रुपये व्यवसाय अनुदान देवून स्वावलंबी बनवावे. बंद सहकारी मेंढपाळ सोसायट्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये अनुदान देवून त्या सोसायट्यांचे पुनर्जीवन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 3 =