“आम्ही सिद्ध लेखिका” ठाणेचा अनोखा उपक्रम
ठाण्यातील अवघ्या वर्षभरातच नावारूपाला आलेली महिलांची सामाजिक आणि साहित्यिक संस्था, “आम्ही सिद्ध लेखिका, ठाणे ” नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते.ह्यावर्षी पितृपक्ष पंधरवाडा निमित्त ह्या संस्थेने वृद्धाश्रम आणि मुलींच्या संवर्धन आश्रमास भेट देऊन मदत करण्याचे अनोखे काम केले आहे.
” गरजवंताना त्याला जगण्यासाठी उमेद देणे,जमेल तशी मदत करून त्यांना उपकृत करणे हे खरे पक्ष पंधरवाड्यातील दान आहे.”
असा विचार जेव्हा संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी मांडला तेव्हा आम्ही सिद्ध लेखिकाच्या सर्व सख्यानी पुढे होऊन भरभरून आर्थिक मदत केली, ज्यातून संस्थेच्या काही सख्यांनी श्रीरंग आनंद आश्रम, वाघबीळ, ठाणे हा वृद्धाश्रम आणि जीवन संवर्धन फॉउंडेशन हा मुलींचा आश्रम ह्या दोन्ही ठिकाणी भर पावसात मोठ्या उत्साहाने लांबून येऊन भेट देऊन वृद्धांसाठी खाद्यपदार्थ, नॅपकिन्स, पावडर डब्बे,ग्रंथभेट इ.तर् लहान मुलींसाठी जीवनावश्यक वस्तू आणि भरपूर खाऊ, सॅनिटरी नॅपकिन्स, वह्या पेन, ब्रश, पेस्ट, कंपास पाउच, पुस्तके इ .चे वाटप केले.त्याचसोबत दोन्हीकडे आर्थिक मदतही केली.
वृद्धाश्रमात विविध प्रकारची गाणी,भजने गाऊन त्यांचे मनोरंजन केले. तर मुलींच्या आश्रमात त्यांना गाणी शिकवली.
एकूणच अतिशय उत्कृष्ट आणि सामाजिक हिताचा उपक्रम सिद्ध लेखिका, ठाणे द्वारे राबवला गेला.
ह्या उपक्रमात संस्थेच्या अध्यक्षा :प्रा. पद्मा हुशिंग, कार्याध्यक्ष :संगीता चव्हाण, सचिव :प्रा मानसी जोशी, कार्यवाह :अस्मिता चौधरी, कार्यकारिणी सदस्य :किरण बर्डे, प्राजक्ता सामंत,अलका दुर्गे जेष्ठ लेखिका :मंजिरी कुलकर्णी, शुभांगी गान, रोहिणी वाविकर, रीमा गुमास्ते, इंदिरा दास ह्या सहभागी झाल्या होत्या.
सौ.मानसी जोशी