You are currently viewing अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी

18 डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर दरवर्षी अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. परंतू यंदाच्या वर्षी कोविड 19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 18 डिसेंबर 2020 हा अल्पसंख्याक हक्क दिवस ऑनलाईन, वेबिनारच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नाजीर शेख यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे ऑनलाईन वेबकास्टिंग एन.आय.सी मार्फत दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी 11.00 वा. करण्यात येणार आहे.

            अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व माहिती देण्यासाठी सदर या ऑनलाईन वेबकास्टिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + nineteen =