कणकवली
आम्हाला महाराष्ट्र राज्याची व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राणे कुटुंबीयांना सेवा करण्याची शक्ती दे… महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेव, हीच दुर्गामाते समोर प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली भाजपा कार्यालय येथे घटस्थापनेदिवशी दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी दुर्गा मातेचे पूजन करण्यात आले.कणकवली शहर बाजारपेठ, पटवर्धन चौक ते भाजप कार्यालय पर्यंत दुर्गा माता मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर विधिवत पूजा आरती करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी सभापती मनोज रावराणे,भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,संचालक विठ्ठल देसाई संदीप मेस्त्री, महेश गुरव,राजन परब,सुशील पारकर,बाबू गायकवाड,सुशील सावंत,विजय भोगटे,सदानंद चव्हाण, ॲड.राजेश परुळेकर,हर्षदा वाळके,भाग्यलक्ष्मी साटम,मेघा गांगण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.